चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचाn (Corona Virus In China) विस्फोट झाला आहे. कोरोनाचं संक्रमण दिवसागणिक वाढताना दिसत आहे. चीन सरकारने उत्तर आणि पश्चिम शहर लान्झोमध्ये (China Imposes Lockdown In Lanzhou) लॉकडाऊन केलं आहे. प्रशासनाचं म्हणणं आहे की, आपात्कालीन स्थितीमध्येच नागरिकांना फक्त बाहेर (Step out only for emergency situation) जाण्याची परवानगी मिळणार आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूचे २९ नवे कोरोनाबाधित (New corona case) रूग्ण आढळून आले आहे. यापैकी लान्झो शहरांत ६ रूग्ण आढळले आहेत. लान्झो शहर उत्तर-पश्चिम प्रांतामधील गांसूची राजधानी आहे. येथील नागरिकांची संख्या ४० लाखांच्या वर आहे.
लान्झो शहरातील (Lockdown in Lanzhou city) नागरिकांवर डोम कावळ्यासारखी नजर ठेवली जाणार आहे. नागरिकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा (Supply of essential items) आणि मेडिकल ट्रिटमेंटसाठी (Medical treatment) गरज लागल्यास घरातून बाहेर जाण्यास दिले जाणार आहे. स्थानिक नागरिकांना भेटण्यास मज्जाव (Restrictions on meeting local citizens) करण्यात आला आहे.
[read_also content=”दिवाळीपूर्वी सामान्यांसाठी खुशखबर; बाजारपेठेत काजू-बदामाच्या दरात मोठी घसरण https://www.navarashtra.com/latest-news/the-price-of-cashew-and-almond-fell-down-in-diwali-osscasion-nrms-196321.html”]
चीन प्रशासन कोरोना विषाणूचं संकट पाहून मोठ्या प्रमाणात सावध झाली आहे. चीन उत्तरेमध्ये राहत असलेल्या नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर टूरिस्ट साईट्वर लोकांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. स्थानिक नागरिकांना सांगण्यात आलंय की, आवश्यक आणि महत्त्वाचं काम असल्यावरच शहरातून बाहेर जावे.