Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-China News: भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीला मोठे यश; गलवान व्हॅलीसह ‘या’ भागांतून चीनची माघार

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये स्थिरता हे नागरिकांच्या हिताचे आहे. यामुळे दोन्ही देशांच्या प्रादेशिक भागांमध्ये शांतता राहणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 15, 2024 | 04:36 PM
India-China News: भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीला मोठे यश; गलवान व्हॅलीसह 'या' भागांतून चीनची माघार

India-China News: भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीला मोठे यश; गलवान व्हॅलीसह 'या' भागांतून चीनची माघार

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद आणि त्यावरून असलेला तणाव हा कायमच बघायला मिळतो. भारताला सर्वाधिक धोका हा चीन आणि पाकिस्तानकडून असल्याचे म्हटले जाते. त्यात अरूणाचल प्रदेश आणि पूर्व लडाखमध्ये कायमच चीन भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान आता भारताच्या परराष्ट्र धोरणाला आणि मुत्सद्देगिरीला यश आले आहे. भारताच्या धोरणामुळे भारत चीन सीमा संघर्ष सुटण्याची शक्यता आहे. चीनने पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेतले आहे. याबाबतची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

भारत चीन यांच्यात सीमावाद कायम आहे. अनेकदा दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद मिटू शकलेला नव्हता. मात्र आता कुठेतरी हा वाद संपण्यास सुरूवात झाली आहे, असे चित्र पाहायला मिळत आहे. पूर्व लडाखमध्ये चीनने आपले सैन्य मागे घेतले आहे. लडाखमधील गलवान व्हॅलीसह चार ठिकाणांवरील सैन्य मागे घेतल्याचे चीनने सांगितले. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर चीनने सैन्य मागे घेतल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितले, ‘दोन्ही देशांच्या सैन्याने चार ठिकाणांवरून माघार घेतली आहे. भारत चीन सीमेवर परिस्थिती स्थिर आहे. दोन्ही देशांच्या सैन्यांनी पश्चिम भागातील चार सेक्टरमधून माघार घेतली आहे. ज्यामध्ये गलवान व्हॅलीचा समावेश आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले, चीनसोबत सैन्य माघारीसंदर्भात संबंधित समस्यांपैकी ७५ टक्के सोडवण्यात आल्या आहेत. मात्र सीमेवरील वाढते लष्करीकरणं हा मोठा आणि गंभीर मुद्दा आहे.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये स्थिरता हे नागरिकांच्या हिताचे आहे. यामुळे दोन्ही देशांच्या प्रादेशिक भागांमध्ये शांतता राहणार आहे. परस्पर सामंजस्य राखणे, विश्वास वाढवणे, सतत संवाद राखणे आणि द्विपक्षीय संबंधांना चालना देणे या सर्व मुद्द्यांवर भारत आणि चीन सरकार भर देणार आहे. भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील सैन्य माघारी घेण्याचे ठरवले होते असे, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

Web Title: China withdrew its troops from the galwan valley and three other areas at ladakh sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 04:31 PM

Topics:  

  • Galwan Valley
  • India China border relations

संबंधित बातम्या

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
1

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

‘भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा, पण…’; राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यानंतर चीन सीमावादावर चर्चा करण्यास तयार
2

‘भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा, पण…’; राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यानंतर चीन सीमावादावर चर्चा करण्यास तयार

सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, भारत-चीन युद्ध दिसणार रुपेरी पडद्यावर
3

सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, भारत-चीन युद्ध दिसणार रुपेरी पडद्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.