भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. २८ विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री उमंग सिंघार ( Umang Singhar) यांनी एका प्रचारसभेत बोलताना भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी भाजपमध्ये येण्यासाठी आपल्याला ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती. असा दावा त्यांनी केला आहे.
काँग्रेसमधून बाहेर पडताना ज्योतिरादित्य यांनी त्यांच्यासोबत २६ आमदारांना सोबत घेतलं होतं. या सगळ्या आमदारांनी राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळेच ही पोटनिवडणूक होत आहे. त्याच वेळी शिंदे यांनी आपल्याला ही ऑफर दिल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र पक्षनिष्ठा महत्त्वाची असल्याने आपण ही ऑफर धुडकावून लावली असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी जोरदार भाषण केले. भाषणाच्या अखेरीस लोकांना आवाहन करताना ‘काँग्रेस पक्षाच्या समोरील पंजा बटन दाबून विजयी…’ असं आवाहनच केलं पण, आपल्याकडून बोलताना चूक झाली हे लक्ष्यात येताच त्यांनी तातडीने दुरुस्ती केली आणि ‘३ तारखेला भाजपच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या उमेदवाराला विजयी करा’ असं आवाहन करून भाषण आवरलं. पण, ज्योतिरादित्य यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सिंधिया जी,
मध्यप्रदेश की जनता विश्वास दिलाती है कि तीन तारीख़ को हाथ के पंजे वाला बटन ही दबेगा। pic.twitter.com/dGJWGxdXad— MP Congress (@INCMP) October 31, 2020