गुजरात दंगलीत नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा कट; एसआयटीची माहिती

गुजरातमधील निवडून आलेले सरकार पाडणे हे सेटलवाड यांचे राजकीय ध्येय होते. विरोधीपक्षाकडून त्यांना यासाठी अवैध मार्गाने ३० लाख रुपये मिळाले होते. विरोधी पक्षाकडून सेटलवाड यांना गुजरातमधील विविध अधिकाऱ्यांसह निरपराध लोकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवणे आणि त्यांच्यावर खटले चालवण्याचे त्या काम करत होत्या, माहिती विशेष तपास पथकाने सेशन्स कोर्टाला दिली.
gujarat riots
Published on: 
Updated on: 

अहमदाबाद : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांच्यासह इतरांनी गुजरात दंगलीत (Gujarat Riots) तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना अडकवण्याचा कट रचला, अशी माहिती विशेष तपास पथकाने (SIT) सेशन्स कोर्टाला (Session Court) दिली. मोदींचे गुजरातमधील सरकार काहीही करुन पाडायचे यासाठी हे कारस्थान रचल्याचेही एसआयटीने म्हटले आहे.

एसआयटीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले; यावेळी त्यांनी आरोपींच्या जामिनाला विरोध केला. एसआयटी अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितले की, गुजरातची प्रतिमा खराब करण्यासाठी कट रचला गेला होता. यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा सहभाग होता. ते तेव्हा राज्यसभा खासदार तथा काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते.

गुजरातमधील निवडून आलेले सरकार पाडणे हे सेटलवाड यांचे राजकीय ध्येय होते. विरोधीपक्षाकडून त्यांना यासाठी अवैध मार्गाने ३० लाख रुपये मिळाले होते. विरोधी पक्षाकडून सेटलवाड यांना गुजरातमधील विविध अधिकाऱ्यांसह निरपराध लोकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवणे आणि त्यांच्यावर खटले चालवण्याचे त्या काम करत होत्या. यामध्ये नरेंद्र मोदीदेखील त्यांच्या टार्गेटवर होते. याप्रकरणी तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस अधिकारी आर.बी. श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांना अटकही करण्यात आली होती.