अमरावती (Amravati). जिल्ह्यात ग्रामीण भागात दहा वीस टक्के नाही तर तबल 70 ते 75 टक्के गावामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. (Coronavirus in Amravati Rural Areas) अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 1561 गावे आहेत त्यापैकी 1284 गावामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. दरम्यान यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील २७७ गावानी मात्र कोरोनाचा गावाच्या वेशिवरच रोखण्यात यश मिळवले आहे. दरम्यान ग्रामीण भागात वाढत असलेल्या Corona रुग्ण संख्येमुळे (patients) प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जेव्हा राज्यात कोरोनाने शिरकाव केला तेव्हा, आधी शहरात मोठया प्रमाणात रुग्ण वाढायचे. तेव्हा मात्र ग्रामीण भागाच्या दूरदूरपर्यंत कोरोनाने शिरकाव केला नव्हता. त्यामुळे शहरातील लोक पुन्हा गावाकडे येऊ लागले होते. परंतु आता दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाने विळखा घातला आहे. ग्रामीण भागात लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत असल्याने आणि कोरोनाचे नियम न पाळत असल्याने ग्रामीण भागात कोरोना पसरला आहे.
[read_also content=”पेरिस/ कोरोनाचे नवे व्हेरिएंट तयार होण्यामागील मुख्य कारण ‘लसिकरण’; नोबेल पुरस्कार विजेते प्राध्यापक ल्यूक माॅन्टेग्नियर यांचा दावा https://www.navarashtra.com/latest-news/the-main-reason-behind-the-development-of-new-variants-of-corona-is-vaccination-nobel-prize-winning-professor-luke-montagnier-claims-nrat-132495.html”]
मेळघाटात कोरोनाचा हाहाकार
अमरावतीच्या मेळघाटामध्ये काही महिने कोरोनाचा शिरकावही नव्हता परंतु होळीच्या सणानंतर मात्र आता कोरोनाचा नवा हॉस्पॉट मेळघाट बनलेला आहे. मेळघाट मधल्या चिखलदारा तालुक्याच्या अनेक गावात देखील मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आढल्याचे दिसून येत आहे. आधीच मेळघाटात आरोग्य यंत्रणा तोकडी आहे त्यातच मोठ्या प्रमाणाव बाधित आढळत आहे.
ग्रामीण भागात २८७ ठिकाण बनले हॉस्पॉट
अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात धोरणाने तब्बल 287 ठिकाणे हे कोरोनाचे हॉस्पॉट बनले आहे. हॉटस्पॉट बनलेले ठिकाण जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक क्षेत्र म्हणूनही घोषित केले आहे. या ठिकाणी ये-जा करण्याला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
‘या’ तालुक्यात आहे सर्वाधिक रुग्ण
अमरावती जिल्ह्यातील वरुड, अचलपूर, मोर्शी, आणि चांदुर बाजार या चार तालुक्यात सर्वाधिक रुग्ण हे कोरोनाचे आढळत आहे. या पैकी तीन तालुक्याना मध्यप्रदेशची सीमा जोडली गेली आहे. त्यामुळे तेथील लोकांचा येथे संपर्क येत असतो त्यामुळे प्रशासणाच्या वतीने उपयोजना केल्या जात आहे.
‘या’ गावाने केली कोरोनवर मात
दरम्यान, वर्धा जिल्हा सिमेवर अमरावती जिल्ह्यातील शेवटचे गाव तिवसा तालुक्यातील जुनी भारवाडी या गावात काही दिवसांपूर्वी कोरोनाने जणू उच्छाद मांडला होता. केवळ तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या या गावात केवळ दोन आठवड्यात कोरोनाचे तबल 57 रुग्ण आढल्याने प्रशासनाची झोप उडाली होती. गाव कोरोनाच्या दहशतीखाली वावरत होते. मात्र त्याच वेळी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन व गावकऱ्यांनी कोरोनाला आता थांबवायचे हा निर्णय घेतला आणि गावासाठी व स्वतःच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुरु केल्या. कोरोना नियमांची कडक अंबलबजावनी गावात अमलात आणली आणि त्याचाच फायदा हा जुनी भारवाडी या गावाला झाला. 15 दिवसात 57 कोरोना बाधित आढळणाऱ्या या गावात मात्र एक महिन्यापासून एकही नवा कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही.