
मुंबई : देशात थैमान घातलेल्या कोरोनाचा सामान करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. देशातील विविध विद्यापीठे, कॉलेज, शैक्षणिक संस्था यांनी यावर विशेष संशोधनही करण्यास सुरुवात केली. कोरोनासंदर्भातील हे प्रशंसनीय संशोधन सर्वाना एकाच छताखाली उपलब्ध व्हावे आणि आपल्या अभ्यासाची दिशा ठरवण्यास मदत व्हावी यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आणि आयआयटी खरगपुरच्या सहकार्याने देशातील सर्व कॉलेज, विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांनी केलेले संशोधन एकत्र करण्यासाठी ‘कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम’ हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. यावर सर्व विद्यापीठ, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांना त्यांचे संशोधन पाठवण्यास सांगितले आहे. एकत्रित करण्यात येणारी या साहित्य विद्यार्थी व शिक्षकांना याचा फायदा होणार आहे.