नागपूर (Nagpur). कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी आरोग्य विभाग (The health department) आणि महानगर पालिका विभागाने (the municipal corporation) लसिकरणाची महामोहीम (vaccination campaign) हाती घेतली आहे. परंतु, लाॅकडाउन शिथिल (the lockdown slows down) होताच बाजारात गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान नागपुरात मंगळवारी 30 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले आहे. यामध्ये शहरातील 18 आणि ग्रामीण भागातील 12 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या शून्य इतकी नोंदविण्यात आली.
[read_also content=”गडचिरोली/ तेलंगणा, मध्यप्रदेश प्रशासनाने प्रकल्पातून पाणी सोडताना आणि अडविताना पूर्वसूचना द्यावी; मंत्री एकनाथ शिंदे https://www.navarashtra.com/latest-news/telangana-madhya-pradesh-administration-should-give-advance-notice-while-releasing-and-blocking-water-from-the-project-minister-eknath-shinde-nrat-145932.html”]
प्राप्त कोरोना अहवालानुसार मंगळवारी नागपूर शहरात 02 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भाग आणि जिल्ह्याबाहेरील रुग्णांची मृत्यूसंख्या नगण्य होती. प्रशासनाकडून मंगळवारी 7041 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर कोरोनामुक्त झालेल्या 120 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 4 लाख 76 हजार इतकी नोंदविली गेली. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 710 असून आतापर्यंतची एकूण मृत्यूसंख्या 9021 इतकी नोंदविली गेली. प्रशासनाकडून लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, कोरोना नियमावलीचे पालक करून स्वतःला कोरोनामुक्त ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.