Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशोक मोरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड व्हावी अशी पर्यावरणासह विविध स्तरांतून मागणी

सुतारवाडी : पर्यावरण, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात अशोक मोरे यांनी मोलाचे योगदान दिले असून, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांची निवड झाल्यास ते अधिक संयुक्तिक होईल, अशी अपेक्षा पर्यावरणासह विविध

  • By साधना
Updated On: Jul 11, 2020 | 06:45 PM
अशोक मोरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड व्हावी अशी पर्यावरणासह विविध स्तरांतून मागणी
Follow Us
Close
Follow Us:

सुतारवाडी : पर्यावरण, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात अशोक मोरे यांनी मोलाचे योगदान दिले असून, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांची निवड झाल्यास ते अधिक संयुक्तिक होईल, अशी अपेक्षा पर्यावरणासह विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून भरीव कामगिरी करणाऱ्या अशोक मोरे यांची या पदासाठी निवड करावी, अशी मागणी काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी केली आहे.

मागील चार ते साडेचार दशके समाजकारणात कार्यरत असलेले मोरे हे १९७८ पासून काँग्रेसचे क्रियाशील सदस्य आहेत. २००२ पासून पर्यावरण विभागाचा कार्यभार सांभाळणाऱ्या मोरे यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात मोलाचे काम केले आहे. पर्यावरण संवर्धन, पर्यावरण रक्षणाचा जागर घडविण्याबरोबरच या क्षेत्रात प्रामाणिकपणे व झोकून काम करणाऱ्यांना सतत बळ व प्रोत्साहन दिले आहे. पर्यावरण संवर्धन ही चळवळ व्हावी, या दृष्टीने ते या क्षेत्रात अविरत कार्यरत राहिले आहेत. याशिवाय शिक्षण, सांस्कृतिक यांसह वेगवेगळ्या स्तरावरही त्यांनी आपले योगदान दिले आहे. मुळचे कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहे येथील असलेल्या मोरे यांचा राज्यभर वावर असतो. रोहा-माणगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी १९९९ मध्ये निवडणूक लढविली होती. तसेच महाराष्ट्र कृषक समाज, कोकण कृषी विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विविध स्तरांतून त्यांची या पदावर निवड व्हावी, अशी मागणी होत आहे. पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे मोरे यांचा या पदाकरिता विचार झाल्यास पर्यावरणवादी व बुद्धीजीवी नागरिकांना पक्षाकडे येण्याच्या दृष्टीने चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. उपाध्यक्ष साहेबअली शेख, सचिव दिलीप पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. नरेश मोरे यांनीही अनेकांकरिता ते प्रेरणास्रोत असल्याचे नमूद केले आहे. विविध सामाजिक संस्थांनीही मोरे यांची निवड झाल्यास मागच्या अनेक वर्षांपासून निरलसपणे काम करणाऱया कार्यकर्त्याचा उचित सन्मान होईल, असे म्हटले आहे..

Web Title: Demand to make ashok more mla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2020 | 05:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.