मुंबई : भाजपकडून शिवसेना नेत्यांवर सातत्याने आरोप केले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. यामुळे राज्यभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राऊत काय बोलणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. संजय राऊत करणार असणाऱ्या गौप्यस्फोटाचे थेट गुजरात कनेक्शन समोर येत आहे. प्रेस कॉन्फरन्स आधीच राऊत काय बोलणार याची माहिती लीक झाली आहे(Direct Gujarat connection of Sanjay Raut’s assassination after BJP’s allegations; The press conference has already leaked information about what Raut will say).
भाजपच्या साडेतीन नेत्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जागी जावे लागेल. आणि अनिल देशमुख जेलच्या बाहेर असतील असा सूचक इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांना भाजपाला दिला होता. त्यामुळं कालपासून राजकीय वर्तुळात राऊत आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असून, जोरदार चर्चा सुरु आहे.
गुजरातमध्ये झाला देशातील सर्वात मोठा घोटाळ झाला असून राऊत याविषयीच पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट करणार असल्याचे समजते. गुजरातमध्ये झालेला देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा आहे. त्यात विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांचे बँक घोटाळेही मागे पडतील असा दावा केला जात आहे.
गुजरातमधील एबीजी शिपयार्ड कंपनी आणि तिचे माजी अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतरांवर २८ बँकांची २२,८४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआयने या प्रकरणी एबीजी शिपयार्ड कंपनी आणि ऋषी कमलेश यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे.
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]