जगभरातील नामांकित कंपन्यांपैकी व्हाट्सऍप एक आहे. हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म असून यावर जगभरातील लाखों ऍक्टिव्ह यूजर्स जोडलेले आहेत. व्हॅट्सऍपवर अनेक नवनवीन फीचर्स पुरवले जातात. कॉलिंगपासून ते स्टेटस ठेवण्यापर्यंत यूजर्स अशा अनेक गोष्टी इथे करून शकतात. कोणाशीही कोणत्याही कोपऱ्यात सहज बोलता यावे, यासाठी व्हाट्सऍप एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. व्हाट्सऍपवर असे अनेक फीचर्स आहेत, जे तुम्हाला माहितीही नसावेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फीचर्सविषयी सांगणार आहोत.
[read_also content=”OMG! फ्री नेटफ्लिक्स? Vi चा नवीन प्लॅन, 70 दिवसांसाठी 1.5GB डेटा आणि बरेच काही… https://www.navarashtra.com/technology/omg-free-netflix-vi-launched-its-new-plan-1-5gb-data-for-70-days-and-more-540712.html”]
आम्ही तुम्हाला अशा फीचरची माहिती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला कळेल की, तुम्ही व्हाट्सऍपवर सर्वात जास्त कोणाशी बोलता. एक तर याने तुम्हाला समजेल की, सर्वात जास्त कोणाशी बोलता आणि त्याचबरोबर एका कॉन्टॅक्टशी चॅट केल्यावर तुमच्या फोनचे स्टोरेज किती भरले जाते, याची कल्पना तुम्हाला येईल. याचा फायदा असा होईल की, तुमच्या फोनमध्ये किती अतिरिक्त निकामी गोष्टी आहेत ज्या तुम्ही हटवू शकता, ते तुम्हाला समजेल.
कशाप्रकारे शोध लागेल?
व्हॅट्सऍपच्या या फीचरचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. फुल स्टोरेजमुळे स्मार्टफोनचा वेग कमी होत असतो, त्यामुळे व्हॅट्सऍपचा डेटा आणि स्टोरेज पर्याय वापरणे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.