उपमुख्यमंत्री म्हणून कोणतेही वेतन घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे
विशाखापट्टनम : पवन कल्याण हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. नुकताच त्यांनी आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. मात्र, पवनने उपमुख्यमंत्री म्हणून पगार आणि कोणत्याही विशेष सुविधांचा लाभ घेणार नाही असा निर्णय घेतला आहे. पवन कल्याण यांनी आंध्रप्रदेशातील पिथापुरममधून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. भाजपचे आमदार पवन कल्याण यांना आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवन कल्याण यांनी चित्रपटांमधून काही काळ ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे.आणि आपले संपूर्ण लक्ष आपल्या मतदारसंघावर केंद्रित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
उपमुख्यमंत्री म्हणून कोणतेही वेतन घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कल्याण पेन्शन वितरण कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर झालेल्या बैठकीत पवन कल्याण म्हणाले, ‘अधिकाऱ्यांनी कॅम्प ऑफिस आणि दुरुस्तीबाबत काय करावे असे विचारले. मी त्याला काही करू नकोस असे सांगितले आणि मी त्याला सांगितले की नवीन फर्निचर घेऊ नको आणि गरज पडली तर मी स्वतः आणेन.’
पवन कल्याण यांनी या वेळी सांगितले की, सचिवालयाचे अधिकारी काही कागदपत्रे घेण्यासाठी आले होते. तीन दिवस पवन त्यांच्या घरी हजर राहिले होते. त्याबद्दल त्यांना 35,000 रुपये पगार देण्यात येणार होता. मात्र पवनने ‘ मी पगार नाही घेऊ शकत असे सांगितले.’ सांगितले. पवन कल्याण हे पंचायत राज खात्याचे मंत्री आहेत. अशा स्थितीत पंचायत राज विभागाकडे निधी अपुरा पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच पवन यांनी पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर चित्रपटात काम करायचे की नाही या प्रश्नावर पवन कल्याण यांनी नुकतेच उत्तर दिले होते. आपण सध्या तरी आपल्या मतदारसंघावरच आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करू इच्छित असल्याचे ते म्हणाले होते. पिठापुरममध्ये एका जाहीर सभेत पवन म्हणाले, ‘खड्डे न बुजवल्याबद्दल किंवा नवीन रस्ते न बांधल्याबद्दल किमान मला कोणी दोषी मानू नये. त्यांचा नवीन चित्रपट OG येत आहे. परंतु ते आपला सर्व वेळ त्यांच्या मतदारसंघावरच व्यतीत करत आहेत. आपल्या कामात प्रामाणिक राहण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. पवन म्हणाले,’ मी OG च्या शूटिंगमध्ये का व्यस्त आहे असा प्रश्न जर कोणी मला विचारला तर मी काय करू? ही भीती मनात ठेवून मी माझ्या चित्रपट निर्मात्यांनाही सांगितले की तुम्ही मला माफ करा.’