दाक्षिणात्य चित्रपटाचे देशभरात चाहते आहेत. मात्र, दाक्षिणात्य राज्यात या चित्रपटांच विशेष क्रेझ असतं. चित्रपट आणि आपल्या आवडत्या कलाकारावर प्रेम करणारे हे चाहते मोठ्या उत्साहात नव्या चित्रपटाचं स्वागत करतात. मात्र, या वेडापायी अनेकदा दुर्घटनाही घडतात. अशीच एक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली. सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) याचा चित्रपट तब्बल 12 वर्षांनी रिलीज करण्यात आला. यावेळी उत्साहाच्या भरात चाहत्यांनी तर थेट थिएटरमध्ये आग लावली.
[read_also content=”इच्छामरण मागणाऱ्या वृद्धांची ‘ही’ कहाणी बदलणार समाजाचा दृष्टिकोन? , ‘आता वेळ झाली’ चित्रपटाचा भावूक करणारा ट्रेलर रिलीज, https://www.navarashtra.com/movies/ata-vel-zaali-trailer-released-rohini-hattangadi-dilip-prabhavalkar-in-lead-role-nrps-505811.html”]
अभिनेत पवन कल्याणचा 2012 मधील ‘कॅमरामॅथन गंगाथो रामबाबू’ हा चित्रपट नुकताच पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. चाहत्यांना याबाबत माहिती होताच त्यांनी मोठ्या प्रमाणावर चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली. मात्र, चित्रपट पुन्हा प्रदर्शित करणं थिएटर मालकांना चांगलाच महागात पडला. आपल्या आवडीच्या सुपरस्टारच्या चित्रपटाच्या री-रिलीजचे सेलिब्रेशन करण्यासाठी काही चाहत्यांनी थिएटरमध्येच आग लावली.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पवन कल्याणचा चित्रपट ‘कॅमरामॅथन गंगाथो रामबाबू’च्या री-रिलीज दरम्यान चाहत्यांनी नंदयालामधील थिएटरमध्ये कागद जाळले. व्हिडीओमध्ये कागद जाळत असताना चाहते जल्लोष करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर आगीची तीव्रता वाढल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर काहींनी सीट्सही फाडल्या.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या चाहत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला का, त्यांच्यावर कारवाई झाली का, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
#WATCH | Andhra Pradesh: During the re-release of Pawan Kalyan’s movie ‘Cameraman Ganga to Rambabu’, fans lit scraps of papers inside a theatre in Nandyala, earlier today pic.twitter.com/aKjbAv0zri
— ANI (@ANI) February 8, 2024