सिंधुदुर्ग: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला या पुतळा उभारणीचे काम देण्यात आले होते. या कंपनीचे संचालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर सारव्जनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी राज्य सरकारकडूनही काही दावे करण्यात आले आहेत. राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाची आणि त्याची निगा राखण्याची, तेथील स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी नौदलाची होती. महाराजांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो. नौदलानेच या पुतळ्याची उभारणी केली होती. मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला या पुतळा उभारणीचे काम देण्यात आले होते. जयदीप आपटे हे या कंपनीचे संचालक आणि केतन पाटील हे स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते.या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा: शिवरायांचा पुतळ्यावरून राजकारण तापलं; सुप्रिया सुळेंचा आरोप, रविंद्र चव्हाणांनी थेट पत्रचं दाखवलं
पण दुसरीकडे केतन पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणात गुन्हा दाखल झालेले स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. केतन पाटील म्हणाले, मी संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन केले नाही. केवळ पुतळ्याच्या चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करून दिले होते. महाराजांच्या पुतळ्याचे ज्या ठाण्यातील एका कंपनीने काम केले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा कामाचा आणि आमचा कोणताही संबंध नाही.
दरम्यान,
हेदेखील वाचा: बुची बाबू स्पर्धेचा आजपासून शुभारंभ, क्रिकेट प्रेमींची नजर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरवर