फोटो सौजन्य: YouTube
लवकरच सणासुदीचा काळ चालू होणार आहे. याच मुहूर्तावर अनेक भारतीय ग्राहक खरेदीसाठी बाहेर निघत असतात. कित्येक जण याच शुभ मुहूर्तवर आपल्या हक्काची कार किंवा बाईक विकत घेत असतात. म्हणूनच अनेक वाहन उत्पादक कंपनीज याच काळात अनेक आकर्षित ऑफर्स ग्राहकांना देतात. तर काही कंपनीज नवीन बाईक्स किंवा स्कुटर्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. आता लवकरच हिरो मोटोकॉर्प आपली नवीन स्कुटर मार्केटमध्ये आणणार आहे.
हिरो मोटोकॉर्पने भारतीय बाजारपेठेत आपला स्वतःचा दबदबा निर्माण केली आहे. कंपनीच्या सर्वाधिक बाईक्स आणि स्कुटर्स नेहमीच विकल्या जातात. आता लवकरच कंपनी आपली नवीन स्कूटर आणणार आहे, Hero Destiny असे या नव्या स्कूटरचे नाव आहे. कंपनीने त्यात नवीन डिझाईन देण्यासोबतच इतर बदलही केले आहेत. जाणून घेऊयात या नवीन स्कुटरमध्ये काय खास असणार आहे.
गेल्या वर्षी, डेस्टिनी प्राइम नावाची स्कुटर लाँच करण्यात आली होती. त्याच वेळी, त्याची अपडेटेड व्हर्जन सुद्धा येणार आहे. ज्याचा टीझर कंपनीने नुकताच रिलीज केला आहे. ज्यामध्ये नवीन डिझाईनसह अनेक फीचर्स देखील दिसत आहेत. स्कुटरच्या लूकवरून, नवीन Hero Destiny फेसलिफ्टने Vespa आणि Lambretta सारख्या ब्रँड्ससोबत वापरलेल्या डिझाइनला फॉलो केले आहे.
हे देखील वाचा: गणेशोत्सवादरम्यान बाईक- स्कुटर घ्यायचा प्लॅन करताय? Yamaha कडून आकर्षक ऑफर्सची घोषणा
नवीन हिरो डेस्टिनी स्कूटरच्या पुढील ऍप्रनमध्ये नवीन लाइटिंग सेटअप आणि कर्व्ही लेयर्ससह, डिझाइनमध्ये महत्वाचे बदल झाले आहेत. नवीन टीझरमध्ये, फ्रंट फेंडर, हेडलाइट, काउल आणि रियर-व्ह्यू मिररमध्ये बदल दिसून आले आहेत. असे म्हटले जात आहे की ही नवीन स्कुटर ड्युअल-टोन पर्ल ब्लॅक कलर पर्यायासह मार्केटमध्ये लाँच होऊ शकते.
नुकतेच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये एक नवीन ड्युअल-टोन स्टेप्ड सीट पाहायला मिळत आहे जे स्पोर्टी लूकसारखे दिसत आहे. त्याचे साइड पॅनेल्स स्मूद सरफेसिंगसह येतात, जे लोकप्रिय रेट्रो स्कूटरचे वैशिष्ट्य आहे. साइड पॅनलवर दिसणारी दुसरी गोष्ट म्हणजे डेस्टिनीचा 3D लोगो, जो त्याच्या डायनॅमिक प्रोफाइलला आणखी वाढवतो आणि तिला अजूनच आकर्षित करतो.
या नवीन स्कुटरच्या इंजिनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. नवीन Hero Destiny 125 मध्ये अलीकडेच सादर केलेल्या 124.6cc, एअर-कूल्ड, SI इंजिनचा वापर पाहायला मिळू शकतो, जे 9 bhp पॉवर आणि 10.4 Nm टॉर्क जनरेट करते. फ्रंट डिस्क ब्रेक नवीन डेस्टिनीच्या काही व्हेरियंटमध्ये आढळू शकतात.