AI washing Machine आणि बरंच काही, जाणून घ्या सॅमसंगच्या इनोव्हेटिव्ह प्रवासाबद्दल
सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज विशेषत: भारतातील बाजारपेठेसाठी डिझाइन करण्यात आलेल्या त्यांच्या आगामी एआय-समर्थित वॉशिंग मशीनची झलक दाखवली आहे. सॅमसंग कंपनी वॉशिंग मशिन्सच्या नवीन युगात एआयसोबत क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहे.
नवीन एआय फिचर असणारी ही वॉशिंग मशिन दैनंदिन नित्यक्रमांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करेल ज्यामुळे नक्कीच ग्राहकांना याचा फायदा होईल. ही मशीन सॅमसंगच्या सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या आणि ग्राहकांना ‘डू लेस अँड लिव्ह मोअर’साठी सक्षम करण्याच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे.
सॅमसंग आणि त्यांच्या वॉशिंग मशीन्स
सॅमसंगचा १९७४ मध्ये पहिली वॉशिंग मशीन लाँच केली होती. यानंतर १९७९ मध्ये कंपनीने आपली पहिली ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन लाँच केली, जिने सिंगल टचमध्ये वॉशिंग व स्पिनिंगची सुविधा देत वॉशिंग प्रक्रिया सोपी केली होती. १९९७ मध्ये, सॅमसंगने फ्रण्ट-लोडिंग वॉशिंग मशिन लाँच केली, जिने कपड्यांचे नुकसान होणे कमी केले आणि उच्च-तापमानामध्ये वॉशिंग सक्षम केले.
२००८ मध्ये, सॅमसंगने इकोबबल वॉशिंग मशिनच्या लाँचसह क्लीनिंगमध्ये नवे बदल घडवून आणले. बबल तंत्रज्ञानाचा वापर करणारी ही पहिली वॉशिंग मशिन होती, ज्यामधून उत्तम क्लीनिंगची खात्री ग्राहकांना मिळत होती. या इनोव्हेशननंतर २०१४ मध्ये ऍक्टिव्ह ड्युअलवॉश तंत्रज्ञान लाँच करण्यात आले होते.
इनोव्हेशनची ही परंपरा कायम राखत सॅमसंगने २०१७ मध्ये फ्लेक्सवॉश वॉशिंग मशिन लाँच केली होती. ही वॉशिंग मशिन विविध लॉण्ड्री गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली. २०२१ पर्यंत सॅमसंगने भारतातील पहिल्या एआय-सक्षम इकोबबल वॉशिंग मशिनच्या लाँचसह स्मार्ट लॉण्ड्री सोल्यूशन्समध्ये नवीन बेंचमार्क स्थापित केले. या वॉशिंग मशिनमध्ये प्रगत एआय तंत्रज्ञान आहे, जे भारतीय कुटुंबांसाठी कपडे धुण्याच्या अनुभवाला एका नव्या उंचीवर घेऊन जाते.