gangubai crosses 100 crore
आलिया भट्ट (Alia Bhatt) ची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट गेल्या आठवड्यातच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. एका आठवड्यातच ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाने १०० कोटींचा टप्पाही पार केला (Box Office Collection) आहे. भन्साळी प्रॉडक्शनच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ही माहिती देण्यात आली आहे.
Itna saara pyaar dene ke liye THEEEENK YOUUUU ?
BOOK TICKETS: https://t.co/NpIKjDCRN1#GangubaiKathiawadi, IN CINEMAS NOW!#SanjayLeelaBhansali @aliaa08 @ajaydevgn @shantanum07 @prerna982 @jayantilalgada @PenMovies @saregamaglobal pic.twitter.com/z4HbSHMd8h
— BhansaliProductions (@bhansali_produc) March 4, 2022
शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “इतकं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद.” तसेच सर्वांना माहिती देत भन्साळी प्रॉडक्शनने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, या चित्रपटाने जगभरात १०८.३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.तर दुसरीकडे, आलिया भट्टनेदेखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि लिहिलं आहे – ‘अभिनेत्री बनण्यासाठी आली होती गंगू, परंतु इथे तर पूर्ण चित्रपटच बनला’.
देशात सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या प्रकोपानंतर हा चित्रपट एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे’.
[read_also content=”अमिताभ बोलतो का रे सेटवर, समोरच्याला घाबरवत असेल ना? जाणून घ्या किशोर कदम काय म्हणाले https://www.navarashtra.com/article/kishor-kadam-shared-his-experience-of-working-with-big-beans-nrsm-249194/”]
आलिया भट्ट, शंतनू माहेश्वरी, अजय देवगण सीमा पाहवा आणि विजय राज यांच्या प्रमुख भूमिका असलेला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीचा सोशल मीडियावर हवा केली होती. परंतु कोरोना महामारीमुळे चित्रपट पुढे ढकलला जात होता.
गंगुबाई काठियावाडीने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अनुक्रमे १०.५० कोटी आणि १३.३२ कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर तिसऱ्या दिवशी १५.३० कोटी रुपयांची कमाई झाली होती. तर चौथ्या दिवशीच्या कमाईत काहीशी घट झालेली दिसून आली. चौथ्या दिवशी या चित्रपटाने ८.१९ कोटींची कमाई केली होती. बुधवारी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आणि ६.२१ कोटींची कमाई केली.त्यांनतर एकूण आकडा पाहता या चित्रपटाने आता १०८.३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सोबतच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे.