मुंबई : २०१४ च्या ईएसबीसी उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून, उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी झालेल्या नियुक्त्या तसेच स्थगिती आल्यानंतर ११ महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय अशोक चव्हाण यांनी विधानसभेत जाहीर केला.
याबाबत माहिती देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यामुळे रखडलेल्या नोकर भरती प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हेतूने हे निर्णय घेण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी नियुक्त झालेल्या तसेच स्थगिती आल्यानंतर खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार ११ महिन्यांच्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना या निर्णयाचा लाभ मिळेल.
मराठा आरक्षणाचे न्यायालयीन प्रकरण, त्यावर आलेली स्थगिती व अंतिम निकाल, तसेच कोरोनामुळे अनेक नोकर भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. त्यातील अनेक एसईबीसी उमेदवारांचे वय विहित मर्यादेपलिकडे चालले होते, शिवाय एसईबीसी आरक्षण रद्दबातल झाल्यामुळेही अनेक विद्यार्थी वयोमर्यादा ओलांडणार होते. एसईबीसीच्या अशा उमेदवारांना दिलासा देण्यासाठी त्यांच्यासाठी वयोमर्यादा ४३ वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातील सवलतीचा लाभही अनुज्ञेय केल्याचे त्यांनी सांगितले.
९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर निर्बंध येण्यापूर्वी एसईबीसी मधून निवडीसाठी शिफारस झालेल्या परंतु, अद्याप नियुक्त्या न मिळालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यासंदर्भात ज्येष्ठ विधीज्ञांचे कायदेशीर मत मागवण्यात आले असून, त्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
अपूर्णावस्थेतील अर्थात अद्याप निवड यादी न लागलेल्या नोकर भरती प्रक्रियांमधील एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गातून पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला असून, उमेदवारांनी निवडलेल्या पर्यायानुसार या निवड प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना राज्य लोकसेवा आयोग तसेच अन्य निवड मंडळांना देण्यात आल्याचे अशोक चव्हाण पुढे म्हणाले.
[read_also content=”खेळ कुणाला दैवाचा कळला…एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार https://www.navarashtra.com/latest-news/cremation-of-three-siblings-on-the-same-cheetah-shocking-incident-in-latur-nrvk-150965.html”]
[read_also content=”हे अंड आहे तरी कुणाचं? एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता https://www.navarashtra.com/latest-news/ostrich-eggs-have-to-wait-50-minutes-to-an-hour-and-a-half-to-boil-nrvk-150227.html”]
[read_also content=”कोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष https://www.navarashtra.com/latest-news/both-doses-of-covishield-antibodies-were-not-found-nrvk-150862.html”]
[read_also content=”सावधान ! ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये…तिसरी लाट येणारचं… https://www.navarashtra.com/latest-news/the-third-wave-of-corona-in-october-november-karte-150867.html”]
[read_also content=”बीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस https://www.navarashtra.com/latest-news/clinical-trial-of-bcg-vaccine-completed-the-vaccine-may-be-effective-against-corona-nrvk-149746.html”]
[read_also content=”लग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक https://www.navarashtra.com/latest-news/demand-for-mocca-action-against-ncp-corporator-dabbu-aswani-and-his-associates-nrvk-149453.html”]
[read_also content=”149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत https://www.navarashtra.com/latest-news/149-year-old-practice-terminated-it-will-save-rs-200-crore-every-year-nrvk-149741.html”]
[read_also content=”बायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल https://www.navarashtra.com/latest-news/the-husband-set-fire-to-a-house-worth-rs-4-crore-as-he-did-not-want-to-give-a-share-to-his-wife-nrvk-150172.html”]
[read_also content=”सकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे? तुमचा दिवस शुभ जाईल https://www.navarashtra.com/latest-news/what-to-see-when-you-wake-up-in-the-morning-have-a-good-day-nrvk-145114.html”]
[read_also content=”जन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि… https://www.navarashtra.com/latest-news/gave-birth-to-an-upturned-girl-the-parents-were-terrified-when-they-saw-the-baby-and-nrvk-146438.html”]
[read_also content=”जीवघेण्या व्हायरसने झोप उडवली https://www.navarashtra.com/latest-news/panic-of-corona-virus-delta-spread-rapidly-in-8-states-including-maharashtra-nrvk-146421.html”]
[read_also content=”प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम https://www.navarashtra.com/latest-news/vanilla-ice-cream-will-be-made-from-plastic-waste-nrvk-146253.html”]
[read_also content=”तब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप https://www.navarashtra.com/latest-news/the-couple-had-been-tying-each-others-hands-for-123-days-now-they-had-a-breakup-nrvk-145996.html”]
[read_also content=”नाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका https://www.navarashtra.com/latest-news/night-shifts-can-be-dangerous-risk-of-diseases-such-as-heart-disease-brain-disease-and-cancer-nrvk-145999.html”]
[read_also content=”एकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या https://www.navarashtra.com/latest-news/mansukh-hiren-murder-case-sunil-mane-remanded-in-nia-custody-till-june-25-pradeep-sharma-is-allowed-to-meet-lawyers-every-day-nrvk-145535.html”]
[read_also content=”‘माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट’; एनआयएसमोर महिला हजर https://www.navarashtra.com/latest-news/my-husband-pradip-sharmas-collection-agent-women-present-before-nis-nrvk-145557.html”]