
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 2 मार्च 1990 रोजी मुंबई शहरात झाला. टायगर हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता ‘जॅकी श्रॉफ’ आणि चित्रपट निर्माती ‘आयशा दत्त’ यांचा मुलगा आहे. ‘हिरोपंती’, ‘बागी’ आणि ‘वॉर’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये टायगर दिसला आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी,
टायगरचं खरं नाव टायगर नसून जय हेमंत श्रॉफ आहे. खरं तर, लहानपणी त्याचे वडील त्याला टायगर म्हणत असत, म्हणून त्यांनी चित्रपटात येण्यापूर्वी त्याचे नाव जय हेमंतवरून बदलून टायगर श्रॉफ केले.
टायगरने ‘अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे’मधून शालेय शिक्षण घेतलं आहे. अभिनयासाठी त्यांनी शिक्षण सोडलं. टायगरटं उच्च शिक्षण फक्त बारावीपर्यंत आहे.
आतापर्यंत 9 चित्रपटांमध्ये दिसलेल्या टायगरने साजिद नादियादवालाच्या हिरोपंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याच्या सोबत अभिनेत्री क्रिती सेनन होती. यानंतर त्याने ‘बागी’, ‘अ फ्लाइंग जट’, ‘मुन्ना मायकल’ आणि ‘वॉर’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
फिटनेस फ्रीक टायगरला डान्सची खूप आवड आहे, ‘मायकेल जॅक्सन’ आणि ‘हृतिक रोशन’ त्याचे रोल मॉडेल आहेत. मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतलेल्या टायगरने अनेक अभिनेत्यांना चित्रपटांच्या प्रशिक्षणासाठी मदत केली आहे. 2014 मध्ये त्याला तायक्वांदोमध्ये ‘ब्लॅक बेल्ट’ देण्यात आला होता.
‘अहमद खान’ दिग्दर्शित ‘बागी 2’ हा चित्रपट टायगरच्या फिल्मी करिअरला टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटात दिशा पाटनीही मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. चर्चांनुसार टायगर बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट केले जातं. ‘हिरोपंती’ चित्रपटासाठी टायगरला स्टारडस्ट आणि आयफा पुरस्कारासह पाच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
अभिनेत्याची एकूण संपत्ती 50 कोटी आहे, तो एका चित्रपटासाठी सुमारे 5 कोटी फी घेतो. टायगर श्रॉफ हा भगवान शिवाचा महान भक्त आहे, तो दर सोमवारी शिवासाठी उपवास देखील करतो. ‘हिरोपंती’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वी टायगर श्रॉफ ‘काशी विश्वनाथ’ देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता.
टायगरच्या आगामी प्रोजेक्टच्या यादीत ‘हिरोपंती 2’, ‘बागी 4’, ‘गणपत’ आणि ‘बडे मिया छोटे मिया’ यांचा समावेश आहे. टायगरच्या आगामी प्रोजेक्टच्या यादीत ‘हिरोपंती 2’, ‘बागी 4’, ‘गणपत’ आणि ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटांचा समावेश आहे.