Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

‘शतक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच हा चित्रपट पाहण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी देखील दिले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 17, 2026 | 03:47 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘शतक’ पाहाण्यासाठी नितीन गडकरीचे आवाहन
  • ‘शतक’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
  • ‘शतक’ चे कौतुक करताना काय म्हणाले गडकरी?
 

RSS च्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून तयार करण्यात आलेला हा चित्रपट संघाची शंभर वर्षांची वैचारिक वाटचाल, सामाजिक योगदान आणि राष्ट्राप्रती असलेले समर्पण प्रभावीपणे अधोरेखित करतो. बाबा रामदेव ज्या राष्ट्रभान, सांस्कृतिक आत्मगौरव आणि सेवा-भावनेचा सातत्याने उल्लेख करतात, तीच चेतना ‘शतक’ या चित्रपटातून सिनेमाच्या माध्यमातून सशक्तपणे मांडण्यात आली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘शतक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाबद्दल आपले मत मांडले आहे. याबद्दल बोलताना सांगितले की, हा चित्रपट भारताच्या राष्ट्रनिर्मितीच्या कमी परिचित अध्यायाची प्रभावी सिनेमॅटिक झलक सादर करतो. संघाच्या कार्याबाबत समाजात विविध स्तरांवर चर्चा होत असली तरी प्रतिमा आणि वास्तव यामध्ये अनेकदा अंतर राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

लोकांनी संघ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा चित्रपट अवश्य पाहावा, असे आवाहन करत गडकरी म्हणाले, “एक स्वयंसेवक म्हणून मला अनेकदा असे वाटते की, प्रतिमा आणि वास्तव किंवा समज आणि प्रत्यक्ष सत्य यामध्ये अंतर राहिले आहे. दुर्दैवाने हे संघाबाबत घडले आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, जवळ या, संघाची विचारधारा जाणून घ्या आणि त्याग, समर्पण व देशभक्तीची भावना समजून घ्या.”

ते पुढे म्हणाले, “मी रस्ते, पूल, एक्सप्रेसवे आणि बोगदे यांसारख्या प्रकल्पांवर काम केले. मी अभियंता नव्हतो, तसेच मला पूर्वानुभवही नव्हता. लोक विचारतात, हे कसे शक्य झाले? त्यावर मी सांगतो की, मी संघाचा स्वयंसेवक आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे. या संस्थांकडून मिळालेल्या मूल्यांनीच मला मार्गदर्शन केले आणि त्यामुळेच मी हे कार्य करू शकलो.”

 

शतकपूर्ती वर्षाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “आपण सर्वांनी एकत्र येऊन हे शताब्दी वर्ष साजरे करावे, संघाला समजून घ्यावे आणि त्याची विचारधारा आपल्या जीवनात स्वीकारावी. हा चित्रपट जरूर पाहावा आणि संघ समजून घेण्याचा प्रयत्न करावा, अशी माझी नम्र विनंती आहे.”

Abhishek Bachchan दिसणार Shah Rukh Khan च्या ‘KING’ मध्ये; धाकड लूकवर चाहत्यांची उत्सुकता

दलित, वंचित आणि गरजू घटकांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले, “गरीबी, भूक आणि बेरोजगारीशी झुंजणाऱ्या समाजघटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण भारतीय आहोत आणि हिंदुत्व ही आपली सांस्कृतिक ओळख आहे. भारतीय ओळख आपल्या इतिहास, संस्कृती आणि परंपरेत रुजलेली आहे. हिंदुत्व हे जातीय किंवा सांप्रदायिक नसून एक जीवनपद्धती आहे. सर्व धर्मांचे लोक भारतीय असू शकतात. हीच प्रेरणा संघाने आम्हाला दिली आहे.”

‘शतक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट संघाच्या विचारप्रवाहाचा प्रवास, सामाजिक उपक्रम आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या राष्ट्रसेवेचा मागोवा घेणारा आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर चर्चेचा विषय ठरला असून, हा चित्रपट येत्या २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Nitin gadkari said rss thinking should be adopted appealed to watch the movie shatak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन
1

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
2

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख
3

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद
4

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.