
मेलबर्न- राफेयल नदालने (Rafael Nadal) इतिहास रचला आहे. २५ वर्षांच्या या स्पॅनिश टेनिस खेळाडूने रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये(Australian Open Final) २५ वर्षांच्या रशियन डेनिल मेदवेदेव याचा पराभव केला आहे. पाच सेट चाललेल्या या मॅचमध्ये २-६,६-७,६-४,६-४,७-५ अशा सेटमध्ये नादालने ही मॅच जिंकली आहे. नदालच्या करीअर मधील हा दुसरा ऑस्ट्रेलियन ओपन किताब तर एकूण २१ वा ग्रँड स्लॅम किताब आहे. ही फायनल मॅच ५ तास २४ मिनिटे सुरु होती.
[read_also content=” बांगलादेशला हरवून भारत पोहोचला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत, पुढील लढत ऑस्ट्रेलियाशी https://www.navarashtra.com/sports/cricket/india-reached-the-semi-finals-of-the-world-cup-by-defeating-bangladesh-nrps-229907.html”]
गेल्या १४५ वर्षांच्या इतिहासात मेन्स सिंगलमध्ये, सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा रेकॉर्ड आता नादालच्या नावे लिहिला गेला आहे. यात त्याने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर आणि सर्बियाच्या नोवाक जेकोविचला मागे टाकले आहे. या दोघांच्याही नावावर २०-२० ग्रँडस्लॅमची कमाई आहे.
२००९ नंतर दुसऱ्यांदा नदालने ऑस्ट्रेलियन ओपनवर कब्जा मिळवला आहे. २००९ मधअये नदालने रॉजर फेडररला पराभूत केले होते. मात्र त्यानंतर चार वेळा नडालला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेरीस १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नदालने पुन्हा एकदा हा किताब आपल्या नावे केला आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन महिला सिंगल्समध्ये शनिवारी ऐश्ली बार्टीने अमेरिकेच्या डेनियल कॉलिन्सला हरवले. बार्टीने कॉलिन्सला ६-३,७-६ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत, तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅम जिंकले आहे. ४४ वर्षांनंतर महिला सिंगल्सचा किताब मिळवणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन महिला ठरली आहे.
[read_also content=”अतिजोखमींच्या संपर्कातील १ कोटींहून अधिक व्यक्तींचा पालिकेनं घेतला शोध, दोन वर्षांत ११ लाख अधिक पाॅझिटिव्ह आढळले https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/bmc-searches-over-1-crore-high-risk-individuals-finds-11-lakh-more-positive-in-two-years-nrps-229927.html”]