HK Bounce Cricket Academy's first win in the Champions Trophy under-14 cricket tournament
पुणे : चॅम्प्स स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित चॅम्प्स करंडक 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ऋषिकेश देशमुख (54 धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर एचके बाऊन्स क्रिकेट अकादमी संघाने स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी संघाचा 33 धावांनी पराभव करून पहिला विजय मिळवला. यामध्ये ऋषिकेश देशमुखने 63चेंडूत 7चौकारासह 54धावा, निलय थोरातने 41 चेंडूत 6चौकाराच्या मदतीने 46धावा केल्या. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 55 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली.
स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी संघाला 25 षटकांत 8 बाद 146 धावापर्यंत मजल
याच्या उत्तरात स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी संघाला 25 षटकांत 8 बाद 146 धावापर्यंत मजल मारता आली. यात ओम दिवेकर 50, ऋषभ पोकळे नाबाद 50, संकल्प सोनार 12 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. एचके बाऊन्स क्रिकेट अकादमीकडून गंधीत पुजारी(2-24), वतन सिंग(1-8), मंगेश पायगुडे(1-17) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 33 धावांनी विजय मिळवून दिला..
निकाल: साखळी फेरी:
एचके बाऊन्स क्रिकेट अकादमी: 25 षटकात 5बाद 179धावा(ऋषिकेश देशमुख 54(63,7×4), निलय थोरात 46(41,6×4), धृव कोंढरे 25, ओम दिवेकर 1-20, नमिश कुलकर्णी 1-18, स्वराज बनसोडे 1-21) वि. वि.स्टार स्पोर्टस क्रिकेट अकादमी: 25षटकात 8बाद 146धावा(ओम दिवेकर 50(50,8×4), ऋषभ पोकळे नाबाद 50(40,7×4), संकल्प सोनार 12, गंधीत पुजारी 2-24, वतन सिंग 1-8, मंगेश पायगुडे 1-17); सामनावीर – ऋषिकेश देशमुख; एचके बाऊन्स क्रिकेट अकादमी संघ 33 धावांनी विजयी.