Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा

गृह मंत्रालयाने (Home Ministry alert)अशा फ्रॉड (Online fraud) किंवा सायबर क्राईम (Cyber crime) संदर्भात एक अलर्ट जाहीर केला आहे. सरकारने या मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मेसेज पाहून त्यावर देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करण्याआधी अनेक वेळा विचार करा. असे केल्याने तुमचे नुकसानदेखील होऊ शकते.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 21, 2021 | 12:12 PM
सावधान! ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : जर तुम्ही नोकरीच्या शोधात (Job search)असाल आणि तुम्हाला ई-मेल (email) किंवा मेसेजद्वारे (message) जॉब ऑफर (job offer) येत असतील तर ही खुश होण्याइतकीच चिंतेही बाब आहे. कारण असे मेसेज मिळाल्यानंतर सावधपणे हाताळण्याची आवश्यकता आहे.

गृह मंत्रालयाने (Home Ministry alert)अशा फ्रॉड (Online fraud) किंवा सायबर क्राईम (Cyber crime) संदर्भात एक अलर्ट जाहीर केला आहे. सरकारने या मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मेसेज पाहून त्यावर देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करण्याआधी अनेक वेळा विचार करा. असे केल्याने तुमचे नुकसानदेखील होऊ शकते.

[read_also content=”सोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का? https://www.navarashtra.com/latest-news/curbing-the-illusion-of-social-media-will-it-really-come-true-nrvb-145132.html”]

अशाप्रकारे येतात ई-मेल

सरकारच्या अलर्टनुसार काही फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती ऑनलाईन नोकरीच्या (online jobs)संधीसंदर्भात सरकार किंवा कॉर्पोरेट संस्था, कंपन्या यांच्या नावाचा गैरवापर करत आहेत. तुमच्या ई-मेल किंवा मेसेंजिंग ॲपवर पाठवण्यात आलेल्या बनावट जॉब अपॉईंटमेंट लेटरपासून सावध राहा. नोकरीसाठी अर्ज करण्याआधी या वेबासाईटवर ऑथेंटिसिटी तपासून घ्या. गृह मंत्रालयाच्या सायबर सिक्युरिटी ट्विटर हॅंडल असलेल्या सायबर दोस्त (Cyber Dost)कडून यासंदर्भात एक अलर्ट जाहीर करण्यात आले आहे आणि सांगण्यात आले आहे की कशा प्रकारे फसवणूक टाळता येऊ शकते.

Beware of #fake #job offers: pic.twitter.com/SoyFmrfYRA — Cyber Dost (@Cyberdost) June 14, 2021

सायबर दोस्त

सायबर दोस्तच्या अधिकृत ट्विटर खात्यावर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की तुमच्या ईमेल किंवा मेसेजिंग ॲपवर पाठवण्यात आलेल्या बनावट जॉब अपॉईंटमेंट लेटरपासून सावध राहा. फसवणूक करणाऱ्या व्यक्ती रजिस्ट्रेशन किंवा मुलाखतीच्या शुल्काच्या नावाखाली तुम्हाला फसवू शकतात. काही फ्रॉड व्यक्ती ऑनलाईन नोकरीच्या संधी दाखवत सरकार आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्या नावाचादेखील गैरवापर करत आहेत. नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याआधी वेबसाईटवर त्याची सत्यता तपासा.

[read_also content=”महिलाच असतात पुरूषांपेक्षा अधिक कार्यतत्पर; जाणून घ्या कसं ते https://www.navarashtra.com/latest-news/women-are-more-active-than-men-learn-how-nrvb-144146.html”]

इथे करा तक्रार

जर तुम्हाला असे वाटते की तुमच्याबरोबर काही चुकीचे होते आहे की तुमची फसवणूक होते आहे तर तुम्ही याची तक्रार सायबर दोस्तची अधिकृत वेबसाईट www.cybercrime.gov.in वर जाऊन तक्रार करू शकता.

तुमचा युपीआय कोणालाही सांगू नका

सायबर दोस्तने नागरिकांना युपीआय (UPI)संदर्भात करण्यात येणाऱ्या फ्रॉडबद्दलही नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. आपल्या युपीआय पिनची माहिती कोणालाही देऊ नका. युपीआय पिन गुप्त ठेवा. जिथे तुमच्या यूपीआय पिनची माहिती विचारली जाते अशा फ्रॉड आकर्षक जाहिराती किंवा ऑफरवर क्लिक करू नका. हा तुमच्या युपीआय खात्यातून पैसे गायब करण्याचा प्रयत्न असतो.

[read_also content=”महिलाच असतात पुरूषांपेक्षा अधिक कार्यतत्पर; जाणून घ्या कसं ते https://www.navarashtra.com/latest-news/women-are-more-active-than-men-learn-how-nrvb-144146.html”]

याशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा संस्थेकडून किंवा कंपनीकडून आलेला क्युआर कोड कधीही स्कॅन करू नका. यामुळे तुमच्या खात्यातून सर्व पैसे गायब होऊ शकतात. युपीआय तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी पिनसंदर्भातील माहिती विचारत नाही.

दिवसेंदिवस सायबर क्राईम किंवा ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण वाढतेच आहे. त्यामुळेच नागरिकांनी यासंदर्भात सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही मोहाला किंवा गैरप्रकाराला नागरिकांनी बळी पडू नये यासाठी सरकार आणि बँकांकडून वेळोवेळी अलर्ट जाहीर करण्यात येतात.

home ministry by cyber crime alert regarding fraud email of messages for job offers

Web Title: Home ministry by cyber crime alert regarding fraud email of messages for job offers nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2021 | 12:12 PM

Topics:  

  • cyber crime
  • regarding

संबंधित बातम्या

Cyber Crime: पहलगाम हल्ल्यात नाव, डिजीटल अरेस्ट अन्… ; मुंबईत वृ्द्ध नागरिकाची लाखोंची फसवणूक
1

Cyber Crime: पहलगाम हल्ल्यात नाव, डिजीटल अरेस्ट अन्… ; मुंबईत वृ्द्ध नागरिकाची लाखोंची फसवणूक

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय
2

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय

शेअर मार्केटच्या आमिषाने 150 हून अधिक नागरिकांची फसवणूक, कोट्यवधींचा घोटाळा उघड
3

शेअर मार्केटच्या आमिषाने 150 हून अधिक नागरिकांची फसवणूक, कोट्यवधींचा घोटाळा उघड

पुण्यात 1 वर्षात 280 कोटींची फसवणूक, वाढते ऑनलाईन सायबर क्राईम धोके; कशी बाळगावी सावधानता?
4

पुण्यात 1 वर्षात 280 कोटींची फसवणूक, वाढते ऑनलाईन सायबर क्राईम धोके; कशी बाळगावी सावधानता?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.