केळीचा खुशखुशीत चिव
कितीही जेवण केले तर मोकळ्या वेळेत किंवा संध्याकाळच्या ववेळी आपल्याला हलकी हलकी भूक लागायला सुरुवात होते. अनेकांना तर चहासोबत नेहमी काही तरी कुरकुरीत आणि चटपटीत खाण्याची सवय असते. अशावेळी नेहमी नाश्त्याला तेच तेच भजी बनवण्याऐवजी तुम्ही घरातच टेस्टी चिवडा बनवू शकता. तुम्ही अनेक प्रकारचा चिवडा खाल्ला असेल मात्र आज आम्ही तुम्हाला केळीपासून कुरकुरीत चिवडा कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.
ही रेसिपी फार कमी वेळेत तयार होते आणि मुख्य म्हणजे हे बनवण्यासाठी फार निवडक आणि सामान्य साहित्याची गरज भासते. हा चिवडा आपण कच्या केळीपासून तयार करणार आहोत. चला तर मग हा हटके चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हे नाश्त्याचे प्रकार, चवीबरोबरच आरोग्यासाठीही ठरेल फायदेशीर!