
vegitable price hike
मुंबई : गेल्या आठवडय़ात जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे भाज्यांच्या मळ्यांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी मुंबई आणि ठाण्याकडे होणारी भाज्यांची आवक मंदावली आणि त्याची परिणती दरवाढीत झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये (APMC market) आज केवळ १०० ते १२० गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांच्या दरातही मोठी (prices of vegetables) वाढ झाली आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दररोज सरासरी २५० ते ३०० भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक असते. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भाज्यांच्या गाड्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी दुसरीकडे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रत्येक भाजीचे दर हे १० ते २० रुपये प्रति किलोने वाढले आहेत. तसेच पालेभाज्यासुद्धा महागल्या आहेत.
सध्या नवी मुंबईत टोमॅटोचे दर हे ३५ ते ४० रुपये किलो असून किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री ५० ते ६० रुपये प्रतिकिलो सुरु आहे. तर शेवगा ६० ते ७० रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. आधी लॉकडाऊन आणि आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे.
कांद्याचे भावही गगनाला भिडले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचे दर २९ रुपये ते ४० रुपयांवर गेले आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचे दर ४० वरुन ६० रुपये किलो झाला आहे. तसेच बटाट्याच्या किंमतीमध्येही १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.
भाज्या घाऊक किरकोळ
भेंडी ४० ८०
गवार ५० १२०
फरसबी ७० १२०
फ्लाँवर २८ १२०
कोबी १८ ६०
टोमॅटो ४० ८०
वाटाणा १५० ३००
वांगी २५ ६०
शिमला मिरची ४० ६०
पडवळ ४० १००
पालेभाज्या (जुडीचे दर)
भाजी घाऊक किरकोळ
मेथी २० ३०
पालक १५ २०
शेपू २० ३०
कोथिंबीर ४५ ५०