Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2024: या स्वातंत्र्यदिनी भारताच्या 5 रॉयल ठिकाणांना नक्की भेट द्या

भारताचा स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा दिवस संपूर्ण भारतासाठी एक अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. यादिवशी भारतीय ध्वजारोहण, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह आजचा दिवस साजरा करतात. हा दिवस आणखीन खास बनवण्यासाठी तुम्ही देशातील काही रॉयल आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 09, 2024 | 09:57 AM
Independence Day 2024: या स्वातंत्र्यदिनी भारताच्या 5 रॉयल ठिकाणांना नक्की भेट द्या

Independence Day 2024: या स्वातंत्र्यदिनी भारताच्या 5 रॉयल ठिकाणांना नक्की भेट द्या

Follow Us
Follow Us:

दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला केला जातो. हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून ओळखला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले.या दिवशी लोक ध्वजारोहण, परेड, सांस्कृतिक कार्यक्रमांसह देशभक्तीपर गाणी गातात. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी एक अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. मात्र यावर्षीचा स्वातंत्र्यदिन तुम्ही आणखीन खास करू शकता. यावेळी तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसोबत काही खास ठिकाणांना भेट देऊ शकता.

आग्रा किल्ला

या स्वातंत्र्यदिनी तुम्ही आग्रा किल्ल्याला भेट देण्याचा विचार शकता. हा किल्ला मुघल स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. आग्रामध्ये, तुम्ही मोती मशीद, दिवाने आम आणि दिवाने खास, ताजमहाल यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. स्वातंत्र्यदिनी तुम्हाला येथे अनेक चांगल्या परेड पाहायला मिळतील.

जोधपूरचा मेहरानगड किल्ला

स्वातंत्र्यदिनी तुम्ही जोधपूरच्या मेहरानगड किल्ल्यालाही भेट देण्याचा विचार करू शकता. हा किल्ला येथील वास्तुकला आणि सुंदर दृश्यासाठी ओळखला जातो. या जागी तुम्ही अनेक राजवाडे, मंदिरे आणि संग्रहालये पाहू शकता. जर तुम्हाला तुमच्या मुलांना इतिहासाशी निगडीत काही दाखवायचे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम ठरेल.

हेदेखील वाचा – ‘हे’ आहेत भारतातील 5 सर्वात लांब रेल्वे मार्ग! प्रवास इतका मोठा की दिवस कमी पडतील

ऑगस्ट क्रांती मैदान

जर तुम्ही मुंबईचे रहिवासी असाल तर स्वातंत्र्यदिनी मुंबईजवळील ठिकाण भेट देण्यासाठी शोधत असाल तर तुमच्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदान एक चांगला पर्याय ठरेल. याच मैदानात गांधीजींनी 9 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो बिगुल वाजवण्यात आले होते. तुम्ही तुमच्या कुटुंबासह याजगेला मैदानाला भेट देण्यासाठी येथे येऊ शकता.

चंद्रशेखर आझाद पार्क

याशिवाय तुमच्याकडे चंद्रशेखर आझाद पार्कला भेट देण्याचा पर्याय आहे. तुमच्या कुटुंबियांसह किंवा मित्र-मैत्रिणींसह तुम्ही या जागेला भेट देऊ शकता. 1931 मध्ये चंद्रशेखर आझाद ब्रिटिश सैनिकांशी लढले. चंद्रशेखर आझाद यांनी वयाच्या 25 व्या वर्षी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले.

जालियनवाला बाग

जालियनवाला बागबद्दल तुम्ही ऐकले असावे. 1919 मध्ये बैसाखीच्या दिवशी जालियनवाला बागेत स्वातंत्र्यसैनिकांनी रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी सभेचे नियोजन केले होते. यानंतर असे आदेश देण्यात आले की जेव्हा जेव्हा लोक येथे येतील तेव्हा कोणतीही सूचना न देता गोळ्या झाडल्या जातील. आजही या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात.

 

 

Web Title: Independence day 2024 must visit 5 royal places of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 09:56 AM

Topics:  

  • Independence Day 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.