भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यात उद्या (रविवार) महासंघर्ष होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli address press conference) पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान, परिषदेत विराट कोहलीच्या कर्णधार पदाबाबत (Captaincy ) प्रश्न विचारला असता, त्याने प्रत्यूत्तर दिलं आहे. आम्ही सामन्यासाठी (We are ready for the match) पूर्णपणे तयार आहोत, असं देखील तो म्हणाला आहे.
टी-२० कर्णधार (T-20) पदाबाबत प्रश्न विचारला असता विराट म्हणाला की, मी या गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोललो आहे. जर तुम्हाला पुन्हा-पुन्हा एकाच गोष्टीवर अडून बसायचं असेल तर मी काहीही करू शकत नाही. आमच्या सर्वांच लक्ष या टूर्नामेंटवर आहे. आम्ही एका संघाच्या रूपात चांगलं खेळू इच्छीतो. जर तुम्हाला काही शोधायचं असेल तर ते तुम्हाला सापडणं कठीण आहे.
विराटने सांगितलं की, सामन्यात आम्ही पूर्णत: आत्मविश्वासाने उतरणार (We will play full confidence) आहोत. पाकिस्तान टीम सुद्धा खूप मजबूत आहे. त्यांच्याकडे अनुभवी खेळाडू आहे. जे सामना उधळून लावू शकतात. आम्ही फक्त आमच्या प्लॅनवर फोकस करत आहोत.
[read_also content=”Pak टीमचा Over Confidence : भारत विरूद्धच्या सामन्याआधीच केली टीमची घोषणा, ‘हा’ खेळाडू संघाबाहेर https://www.navarashtra.com/latest-news/the-team-was-announced-before-the-match-against-india-nrms-195420.html”]
कोहलीने हार्दिक पांड्याबाबत मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, हार्दिक आता सामन्यासाठी एकदम फिट आहे. त्याच्या गोलंदाजीवर आम्हाला काहीच शंका नाहीये. कारण तो एक फिनिशर खेळाडू म्हणून ओळखला जातो.