टी-२० वर्ल्डकपच्या महायुद्धाला उद्या (रविवार) पासून सुरूवात होणार आहे. यामध्ये पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध भारत (Ind Vs Pak) यांच्यामध्ये होणार आहे. परंतु मागील काही दिवसांपासून भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya ) खेळणार की नाही? यावर बरीच चर्चा रंगली होती. परंतु या चर्चेला आता भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पूर्णविराम दिला आहे. पाक विरूद्ध सामन्यात भारताचा पहिला सामना होणार असून कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद (Press Conference) घेतली. यामध्ये विराट कोहलीने हार्दिक पांड्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये २४ ऑक्टोबरला संध्याकाळी ७.३० वाजता सामना खेळण्यात येणार आहे. भारताच्या प्लेइंग-११ बद्दल (Playing-11) कोहलीने सांगितलं की, प्लेइंग-११ मध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश करण्यात येणार आहे. हे सामन्याच्या वेळीच सांगितलं जाईल. कारण आमच्याकडे उत्कृष्ट प्रकारचे फलंदाज आणि गोलंदाज आहेत.
विराट कोहलीने सांगितलं की, हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीबाबत आम्हाला काहीच (We Don’t Have Doubt About Bowling) शंका नाहीये. कारण एक फिनिशर म्हणून तो (Hardik Is A Finisher) सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन करतो. अशातच ओव्हर्सची गरज पडली तर, त्यासाठीही आमच्याकडे एक प्लॅन आहे. त्यामुळे आम्हाला जास्त विचार करण्याची आवश्यकता नाहीये. हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट आहे.
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्याने गोलंदाजी केलेली नाहीये. दुखापत झाल्यानंतर पांड्याने पुन्हा एकदा आयपीएलच्या (IPL Match) सामन्यात वापसी केली. परंतु तो गोलंदाजी करू शकला नाही. अशातच हार्दिकला प्लेईंग-११ मध्ये जागा मिळणार की नाही? यावर प्रश्न उपस्थित होत होते. परंतु हार्दिक गोलंदाजी करणार नव्हता म्हणून शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) भारतीय संघात एन्ट्री देण्यात आली होती.
[read_also content=”भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतात आयोजित करणं कठीण, सौरव गांगुलीची खळबळजनक प्रतिक्रिया… https://www.navarashtra.com/latest-news/sourabh-ganguly-gave-the-statement-over-the-india-vs-pakistan-match-in-t-20-world-cup-2021-nrms-195330.html”]
विराट कोहलीने सांगितलं की, भारताच्या गोलंदाजीबाबत कहीच शंका नाहीये. आमची गोलंदाजी उत्तम आहे. त्यामुळे या गोष्टीबद्दल आम्ही खूप पॉझिटिव्ह (Positive) आहोत. भारताच्या गोलंदाजीने मागील काही सामन्यांमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यामुळे अधिकाधिक सामन्यांत आम्ही बाजी मारली.
A bit of shooting fun with the boys to make your day brighter ?
Team India in the #BillionCheersJersey is a vibe! #ShowYourGame @mpl_sport pic.twitter.com/8MnycPSKer
— BCCI (@BCCI) October 22, 2021