नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर एप्रिलच्या मध्यापर्यंत लीगमध्ये सामील होईल. चहरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. तिसर्या टी-२० मध्ये, त्याच्या क्वाड्रिसेप स्नायूला दुखापत झाली, त्यानंतर त्याला शस्त्रक्रियेसाठी सुचवण्यात आले.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दीपक चहरवर दुखापतीची शस्त्रक्रिया होणार नाही आणि एप्रिलपर्यंत तो संघाचा भाग असेल. तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन कालावधीतून जात आहे. चहरला चेन्नईने मेगा लिलावात १४ कोटींना विकत घेतले.