Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केदार शिंदेचा नवा सिनेमा ‘बाईपण भारी देवा’! जागतिक महिला दिनानिमित्त केली घोषणा

‘बाईपण भारी देवा’मध्ये सहा प्रमुख लोकप्रिय महिला कलाकार असणार आहेत, पण त्याची नावं अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:01 PM
केदार शिंदेचा नवा सिनेमा ‘बाईपण भारी देवा’! जागतिक महिला दिनानिमित्त केली घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : प्रेक्षकांच्या मनातील भावना, आवडीनिवडी अचूक ओळखून, तुमच्याआमच्या घरातील गोष्ट अगदी सहजरित्या प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत एमव्हीबी मीडिया निर्मित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका वैशिष्ठ्यपूर्ण पोस्टरने घोषणा करण्यात आली आहे.

‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर आज जिओ स्टुडिओज् ने हा दुसरा पण अत्यंत वेगळा बाज असलेला चित्रपट घेऊन येत आहेत. तसंच एमव्हीबी मीडिया यांची निर्मिती असलेला हा पहिलाच चित्रपट असून माधुरी भोसले यांनी याची निर्मिती केली आहे. आणि त्यांना बेला शिंदे आणि अजित भुरे यांचा सह-निर्माते म्हणून सहभाग लाभला आहे.

आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या, एखाद्या संवेदनशील घटनेविषयी, सामान्य माणसाच्या प्रश्नाविषयी मात्र अगदी हलक्याफुलक्या पध्दतीने त्याची मांडणी करण्याची ताकद केदार शिंदे यांच्या चित्रपटात असते.

चित्रपटाच्या या घोषणेनिमित्त दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. मला कायम असे वाटते की, महिला दिन साजरा करण्यासाठी केवळ एकच दिवस पुरेसा नसून दररोजच महिलांचं काम, सहभाग, योगदान आणि आवाका याची जाणीव ठेवायला हवी. हाच विचार घेऊन हा चित्रपट मी निर्माण केला आहे. आणि जर आपण बघितलं तर आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचं कर्तुत्व भारी ठरतं आहे. त्यांच्या याच धडाडीला माझा हा कलात्मक सलाम आहे”

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत माधुरी भोसले निर्मित ‘बाईपण भारी देवा’मध्ये सहा प्रमुख लोकप्रिय महिला कलाकार असणार आहेत, पण त्याची नावं अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

Web Title: Kedar shindes new movie baipan bhari deva announcement on the occasion of international womens day nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2022 | 03:59 PM

Topics:  

  • kedar shinde

संबंधित बातम्या

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटातून उलगडणार सासू-सुनेच्या नात्याची नवी गोष्ट
1

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटातून उलगडणार सासू-सुनेच्या नात्याची नवी गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.