मुंबई : राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणाची पाळेमुळे खोदण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून या प्रकरणात कुंद्राने कमावलेला पैसा देशाबाहेरील अन्य बँकांमध्ये ठेवला असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर पोलिसानी चौकशीला वेग दिला असून पोलिसांच्या गुन्हे शाखेने लंडनमधील एका बँकेशी पत्रव्यवहार केला आहे. कुंद्राशी संबंधित बँक खात्याच्या माहितीसाठी गुन्हे शाखेने हा पत्रव्यवहार केल्याची माहिती सूत्राने दिली. तथापि, अद्याप बँकेकडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. लंडनमधल्या लॉएड बँकेसोबत गुन्हे शाखेने पत्रव्यवहार केला असून त्या बँकेत कुंद्राशी संबंधित बँक खाते असल्याने माहिती मागवण्यात आली आहे.
पोलिसांनी कुंद्राविरोधात अश्लील साहित्य तयार करणे आणि प्रदर्शित करणे असे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात तपास सुरू असून कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये साठहून अधिक व्हिडीओ सापडले आहेत असे पोलिसांनी सांगितले आहे.
राज कुंद्राने आता मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. यापूर्वी महानगर दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाने त्याचा जामीन नामंजूर केला आहे. मुंबई पोलिसांनी माझ्या विरोधात दाखल केलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य नसून कनिष्ठ न्यायालयांनी हा मुद्दा विचारात घेतला नाही, असा दावा कुंद्राने केला आहे. तसेच या प्रकरणातील अन्य आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, असेही अर्जात म्हटले आहे.
[read_also content=”आत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती! व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम https://www.navarashtra.com/latest-news/pooja-was-drunk-before-committing-suicide-big-revelation-in-the-viscera-report-rathores-problems-persist-nrvk-165091.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि… https://www.navarashtra.com/latest-news/19-year-old-girl-married-to-old-man-sit-will-investigate-nrvk-164601.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html”]
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]