लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्राला डेंग्यूची लक्षणे आढळल्याची माहिती समोर आली आहे. डेंग्यूची लक्षणे आढल्यामुळे आशिष मिश्राला तुरूंगातून थेट रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल (शनिवार) संध्याकाळी आशिषची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याची तपासणी केली असता, आशिषची शुगर लेव्हल वाढल्याचं सांगण्यात आलं होतं.
आशिष मिश्राचे ब्लड रिपोर्ट पाहिले असता, त्यामध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली होती. तसेच त्याची प्रकृती काल (शनिवार) रात्री १० च्या सुमारास खालावल्यामुळे तुरूंगातून थेट रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चालवल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेला हिंसक वळण लागल्यानंतर अजून चार आंदोलकांचा मृत्यू झाला होता.
[read_also content=”India Vs Pakistan : टीम इंडिया विरुद्ध पाकितान मॅचमध्ये किती हाय स्कोअर होईल?, आयपीएल २०२१ च्या मॅचेसवरुन वर्तवण्यात येतोय अंदाज https://www.navarashtra.com/latest-news/today-match-between-india-vs-pakistan-in-t20-world-cup-2021-nrms-195685.html”][blurb content=””]
आशिष मिश्राला अटक करण्यात आली असून शनिवारी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत एकूण १३ जणांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी आशिष मिश्रासोबत चार आरोपींना २ दिवसांसाठी पोलीस रिमांडसाठी पाठवण्यात आले होते.