कोरेगाव : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशान्वये कोरेगाव प्रांताधिकारी ज्योती पाटीलनाईकडे यांनी आज गुरुवारी कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात श्रद्धा सरगडे व स्वाती सरगडे यांनी काढलेल्या चिठ्याद्वारे 23 गावातील पोलीस पाटीलपदांची आरक्षण सोडत जाहीर केली.
यावेळी कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे तहसीलदार अमोल कदम, नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, प्रांत कार्यालय प्रभारी नायब तहसीलदार रणजित जाधव, अव्वल कारकून अमोल लोखंडे, महसूल सहाय्यक रमाकांत फडतरे, मंडलाधिकारी शिवाजी पिसाळ, तलाठी शंकर काटकर यासह 23 गावातील विविध पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
17 फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आरक्षण सोडतीमध्ये भिवडी, दुर्गळवाडी, गिघेवाडी, वाघोली, पवारवाडी या पाच गावात सोडतीद्वारे ओपन आरक्षण जाहीर झाले. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक गाव निवडीदरम्यान न्हावी बुद्रुक (जयपूर), चिमणगाव, सुर्ली, करंजखोप या चार गावांमधून महिला आरक्षणासाठी जाहीर सोडतीद्वारे चिमणगाव गावाची सोडत जाहीर झाली.
महिला आरक्षणासाठी जाहीर सोडतीद्वारे अनुसूचित जमाती आरक्षण प्रवर्गासाठी दोन गावांची निवड करण्यासाठी तडवळे संमत कोरेगाव, गोडसेवाडी, तांदुळवाडी, आसनगाव, वाठार किरोली, अनपटवाडी, पिंपरी या गावांच्या चिठ्यांमधून श्रद्धा सरडे हिने गोडसेवाडी व पिंपरी या गावांसाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षण जाहीर झाले.
वि. मा. प्र. आरक्षण प्रवर्गासाठी अंभेरी व कठापूर या दोन गावांच्यामधून कटापूर पोलीस पाटील पदासाठी वि.मा.प्र. महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. भंडारमाची गावाला वि.जा. ( अ ) आरक्षण प्रवर्गासाठी सोडत जाहीर करण्यात आली.
तसेच जायगाव भिवडी मदनापुर दुर्गळवाडी गिघेवाडी, वाघोली, सर्कलवाडी, कोळवडी, पवारवाडी, या नऊ गावामधून प्रथम भ ज (ड ) प्रवर्गासाठी जाहीर सोडतीद्वारे सर्कलवाडी, तर भ. ज. ( ड ) महिला आरक्षण कोलवडी गाव आरक्षण सोडतीद्वारे जाहीर झाले. त्यानंतर शिल्लक राहणाऱ्या सात गावांमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी जाहीर सोडतीद्वारे जायगाव सोडत जाहीर झाली. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला आरक्षणासाठी मदनापूर गावाची सोडतीद्वारे आरक्षण जाहीर झाले.
उर्वरित भिवडी, दुर्गळवाडी, गिघेवाडी, वाघोली, पवारवाडी ही गावे खुल्या प्रवर्गासाठी सोडती द्वारे जाहीर करण्यात आली.