Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१ जूनपासून बदलणार ६ नियम, सामान्य माणसाच्या खिशावर कसा होणार परिणाम?; वाचा सविस्तर

एक नवीन आरटीआय फायलिंग पोर्टल येत आहे, जे ७ जूनपासून अंमलात येईल. दरम्यान, १ ते ६ जूनदरम्यान जुने पोर्टल पूर्णपणे बंद असेल. १ जूनपासून सिलिंडरच्या किमती बदलतील आणि लहान बचत योजनांवरील व्याज नियमात बदल दिसून येईल.

  • By Vivek Bhor
Updated On: May 31, 2021 | 10:00 AM
१ जूनपासून बदलणार ६ नियम, सामान्य माणसाच्या खिशावर कसा होणार परिणाम?; वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्लीः १ जूनपासून सरकारी कामात बरेच काही बदलणार आहे, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. बँकेचे काम, एलपीजी सिलिंडरचे दर, विमान भाडे, बचत योजनांवरील व्याज आणि आयटीआर फायलिंग यासंबंधीच्या नियमांत १ जूनपासून बदल होणार आहेत. १ जूनपासून गोल्ड हॉलमार्किंगचा नियमही बदलणार होता, परंतु आता १५ जूनपासून याची अंमलबजावणी होणार आहे. एक नवीन आरटीआय फायलिंग पोर्टल येत आहे, जे ७ जूनपासून अंमलात येईल. दरम्यान, १ ते ६ जूनदरम्यान जुने पोर्टल पूर्णपणे बंद असेल. १ जूनपासून सिलिंडरच्या किमती बदलतील आणि लहान बचत योजनांवरील व्याज नियमात बदल दिसून येईल.

करदात्यांसाठी नवीन वेब पोर्टल सुरू करणार New Income Tax Return Return File Portal

आयकर विभाग पुढील महिन्यात करदात्यांसाठी नवीन वेब पोर्टल सुरू करणार आहे. नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर करदात्यांना आयकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ होईल. १ ते ६ जून दरम्यान विद्यमान वेब पोर्टल सहा दिवस बंद असेल. यानंतर ७ जून रोजी नवीन ई-फायलिंग पोर्टल सुरू होईल. कर विभागाच्या प्रणाली विभागांकडून जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, ‘विद्यमान वेब पोर्टलवरून www.incometaxindiaefiling.gov.in नवीन वेब पोर्टल www.incometaxgov.in वर हस्तांतरणाची प्रक्रिया १ जून रोजी पूर्ण होईल आणि या दिवशी नवीन वेब पोर्टल कार्यान्वित होईल.

[read_also content=”त्याने सेक्स डॉलसोबत केला विवाह; आता या बॉडीबिल्डरच्या आयुष्यात येणार आहे अशी व्यक्ती की वाचल्यानंतर तुम्हीही व्यक्त कराल आश्चर्य https://www.navarashtra.com/latest-news/bodybuilder-who-is-in-threesome-with-2-sex-dolls-wants-to-introduce-male-doll-in-relationship-nrvb-135850.html”]

पीएफ नियम PF Rules Changes

सर्वप्रथम पीएफबद्दल जाणून घेऊयात. कर्मचार्‍यांसाठी ही महत्त्वाची बातमी असू शकते. १ जूनपासून पीएफच्या नियमांमध्ये काही बदल केले जात आहेत, ज्याचा थेट परिणाम कर्मचार्‍यांच्या जमा झालेल्या भांडवलावर होऊ शकतो. नव्या नियमानुसार, आता कंपनीला आपल्या कर्मचार्‍यांच्या खात्याला आधार कार्डशी लिंक करावे लागेल. हा नियम १ जूनपासून लागू असेल. जर पीएफ खाते आधारशी जोडलेले नसेल तर कंपनीकडून पीएफमध्ये सामील होणारी रक्कम थांबू शकेल. याचा थेट परिणाम आपल्या जमा झालेल्या भांडवलावर होऊ शकतो. हे कार्य खूप सोपे आहे आणि पीएफच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे केले जाऊ शकते.

सिलिंडर किंमत LPG Gas Cylinder Cost

दरमहा एलपीजी सिलिंडरची किंमत बदलते. १ जून रोजी यातही बदल दिसेल. तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरची किंमत बदलतात. म्हणूनच १ जूनपासून आपल्याला गॅस सिलिंडरच्या किमतीत काही फरक दिसू शकेल. आतापर्यंतच्या ट्रेंडप्रमाणेच सिलिंडर गॅस महाग होण्याची शक्यता आहे. लोक असेही म्हणतात की, कोरोनाच्या कठीण काळात लोकांना दिलासा मिळू शकेल. परंतु ज्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे दर सुरु आहेत, त्यानुसार एलपीजीची किंमत कमी करणे शक्य नाही.

विमानांच्या भाड्यावर परिणाम Flights Fare Changes

सरकारच्या आदेशानुसार १ जूनपासून हवाई प्रवास महागणार आहे. सरकारने कमीत कमी हवाई भाड्याची मर्यादा १६ टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. ही वाढ १३ ते १६ टक्के असेल. याचा थेट परिणाम हवाई भाड्यावर दिसून येईल. महागड्या तिकिटांवर होणारा परिणाम कमी होईल, पण स्वस्त तिकिटे महाग होतील. हवाई भाड्यांची कमी मर्यादा वाढविण्याचा थेट परिणाम स्वस्त तिकिटावर दिसून येईल. आताच याचा परिणाम थोड्या लोकांवर दिसून येईल, कारण हवाई प्रवास थांबलेला आहे आणि त्यामध्ये प्रवाशांची संख्या नाममात्र आहे, जी सुरु आहे.

[read_also content=”सायबर हल्ल्यांच्या सावटाखाली भारत; लोकांच्या सायबर सुरक्षिततेची काळजी घेणे सरकारला महत्त्वाचे वाटत नाही का? https://www.navarashtra.com/latest-news/india-under-cyber-attacks-doesnot-the-government-care-about-the-cyber-security-of-the-people-nrvb-135845.html”]

व्याजदरात बदल Rate Of Interest Changes

छोट्या बचत योजनांवर व्याजदर बदलू शकतात. मागील वेळी देखील जोरदार विरोधामुळे ते थांबविण्यात आले. मागील वेळी झालेल्या निवडणुका लक्षात घेता नवीन दरही रोखण्यात आले होते. परंतु यावेळी नवीन दर लागू होण्याची शक्यता आहे. सरकार या निर्णयाबाबत आदेश जारी करेल.

बँक ऑफ बडोदाची नवी यंत्रणा Bank Of Baroda New System

बँक ऑफ बडोदा १ जूनपासून चेक पेमेंटचे नियम बदलणार आहे. बँकेच्या वतीने पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन नियम १ जूनपासून लागू होणार आहे. फसवी चेक रक्कम लक्षात घेता पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन लागू केले जात आहे. ही यंत्रणा केवळ ५० हजार रुपयांच्या धनादेशाच्या वर लागू असेल. याचा फायदा घेण्यासाठी प्रथम बँकेकडून खातरजमा होणे आवश्यक आहे. ग्राहक बँकेला काही महत्त्वाची माहिती देईल, तरच ही सुविधा उपलब्ध होईल.

lpg cylinder price flight fare 6 rules pf small saving interest rates will change from 1 june 2021

Web Title: Lpg cylinder price flight fare 6 rules pf small saving interest rates will change from 1 june 2021 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2021 | 10:00 AM

Topics:  

  • lpg cylinder

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.