मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाने निकाल लावण्याचा निर्णय शिक्षण विभाग व राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानंतर बुधवारी मूल्यमापन पध्दत कशी असावी, यांचा तपशील आणि वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.
त्यानुसार निकाल जाहीर करण्यासाठी शाळेतील ७ सदस्यांची निकाल समिती स्थापन करून २० ते २५ दिवसांत निकाल विभागीय मंडळाकडे सादर करावा लागणार आहे. शिक्षक आणि वर्गशिक्षकांना ११ जूनपासून १० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण संकलित करून ते निकाल समितीला सादर करायचे आहेत. त्यापुढील १० दिवसांत निकाल समिती व मुख्याध्यापकांना ते गुण प्रमाणित करून विभागीय मंडळाकडे द्यायचे आहेत.
निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालाच्या २ प्रती तयार करायच्या आहेत. त्यातील एक प्रत मुख्याध्यापकांकडे तर दुसरी विभागीय मंडळाकडे जमा करायची आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या नववीच्या संकलित निकालाची प्रत सुध्दा मुख्याध्यापकांना विभागीय मंडळाकडे जमा करायची आहे.
[read_also content=”केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचना : कोरोना संक्रमित मुलांवर सीटी स्कॅनचा जाणीवपूर्वकच वापर करा, रेमडेसिवीर देणे टाळा; चाचणीसाठी ६ मिनिटे चालण्याचा सल्ला https://www.navarashtra.com/latest-news/on-corona-infected-children-use-ct-scan-wisely-ban-the-use-of-remdesivir-walk-test-advice-nrvb-140416.html”]
दहावीचे मूल्यमापन करताना पहिल्या ५० गुणांसाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या नववीच्या १०० गुणांपैकी असलेल्या गुणांचे शाळा स्तरावर ५० टक्के गुणांमध्ये रूपांतर करायचे आहे. उरलेल्या ५० गुणांसाठी दहावीच्या यंदाच्या लेखी गुणांचे ३० गुणांमध्ये रूपांतर करायचे आहे.
अपवादात्मक परिस्थितीत जर शाळेत प्रथम सत्र किंवा सर्व परिक्षा झाल्या नसतील तर दहावीच्या अभ्यासक्रमावर आयोजित सर्व चाचण्या, गृहपाठ, प्रकल्प, स्वाध्याय यांचे शिक्षकांना ३० पैकी गुणांमध्ये रूपांतर करायच्या सूचना दिल्या आहेत.
Kind Attn: Here's the timetable for tabulation of marks for Std X board exams 2020-21 based on internal assessments. Requesting all schools to adhere to the schedule for timely declaration of results. For more details, refer https://t.co/copdv54IAR#SSC #InternalAssessment pic.twitter.com/D3TDXIUCx9
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 9, 2021
[read_also content=”सावधान! तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास गृह मंत्रालयाने दिलाय अलर्ट https://www.navarashtra.com/latest-news/do-not-give-your-personal-details-to-anyone-kyc-cyber-fraud-central-government-warns-nrvb-140394.html”]
परंतु शिक्षक आणि मुख्याध्यापक हे संभ्रमात आहेत. अजूनही अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन पूणपणे शिथिल केलेले नाहीत. तर शिक्षक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीच्या, यावर्षीच्या गुणांचे मूल्यमापन कसे करणार? असा प्रश्न शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर आहे.
SSC results in 20 days after internal evaluation Decision to set up results committee of 7 members of the school