mehul choksi
पंजाब नॅशनल बँकेत(PNB Scam) १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सीविरोधात(Mehul Choksi) डोमिनिका कोर्टात (Dominica Court) सुनावणी सुरु आहे. मेहुल चोक्सीला अँटीग्वात पाठवणार? की, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा होणार? हे या निकालावर अवलंबून आहे. या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरु झाली असून या निकालाकडे लक्ष लागून आहे. मेहुल चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळाला होता. २०१८ पासून मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये वास्तव्यास होता.
Fugitive diamantaire Mehul Choksi’s hearing underway at the High Court of Justice in Dominica pic.twitter.com/VptVF2P33A — ANI (@ANI) June 2, 2021
इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसीच्या आधारावर मेहुल चोक्सीला भारतात आणणं शक्य आहे. सध्या मेहुल चोक्सी अँटिग्वाचा नागरिक असल्याचा दावा करत आहे. मात्र भारताने त्याचे नागरिकत्व अजून रद्द केलेले नाही. त्यामुळे तो भारतीय नागरिक असल्याचं सिद्ध होईल आणि त्याला भारतात आणणं सोपं होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे. चोक्सीला आणण्यासाठी सीबीआय आणि ईडीची टीम डोमिनिका येथे पोहोचली आहे.
[read_also content=”मराठा आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर नव्याने मागासवर्ग आयोग नेमण्याच्या हालचाली सुरु,वर्षावरील बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/maharashtra-government-is-planning-to-arrange-new-obc-commission-for-reservation-issue-nrsr-137058/”]
दरम्यान माझ्या पतीची प्रकृती ठिक नसते. ते अँटिग्वाचे नागरिक आहेत. त्यांना तेथील संविधानानुसार सर्व सुरक्षा मिळण्याचा अधिकार आहे. माझे पती सुरक्षितरित्या अँटिग्वा येथे येतील यावर माझा विश्वास आहे, असं मेहुल चोक्सीच्या पत्नीनं सांगितलं आहे.
मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये लपून बसला होता. मात्र २३ मे रोजी नाट्यमयरित्या मेहुल चोक्सी पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्याला भारतात आणण्यासाठी तपास यंत्रणा डोमिनिका येथे पोहोचल्या आहेत.