Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोना योद्ध्यांचा पगार कापण्याऐवजी त्यांना वेतन वाढवून द्या, खासदार जलील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना शासनातर्फे त्यांना उत्तेजनार्थ / विशेष वाढीव वेतन देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांनी केली आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 11, 2021 | 05:22 PM
कोरोना योद्ध्यांचा पगार कापण्याऐवजी त्यांना वेतन वाढवून द्या, खासदार जलील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांनी राज्यातील कोरोना निवारणाच्या उपाययोजनांकरिता राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मे २०२१ च्या वेतनातील एक / दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये(CM Fund) देणगी म्हणून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यातून अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना वगळुन शासनातर्फे त्यांना उत्तेजनार्थ / विशेष वाढीव वेतन देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात खासदार इम्तियाज जलील यांनी नमुद केले की, राज्यात आपत्ती निवारणाच्या उपाय योजनांकरिता राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से. व महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकिय अधिकारी / कर्मचारी यांच्या माहे मे २०२१ च्या वेतनातील एक / दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करुन देण्याबाबत दिनांक ७ मे २०२१ रोजी शासन निर्णय काढण्यात आला होता त्याचे मी स्वागतच करतो.

[read_also content=”हवामान खात्याने दिला चक्रीवादळाचा इशारा, किनारपट्टीच्या भागात हाय अलर्ट जारी https://www.navarashtra.com/latest-news/hurricane-warning-by-weather-department-beach-area-on-high-alert-nrsr-127339.html”]

ते पुढे लिहीतात की, या शासन निर्णयामधून पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना वगळण्यात यावे. कारण पोलीस कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांनी या कोरोना कोविड – १९ च्या कालावधीमध्ये मेहनत तर घेतलीच आहे. परंतु त्यांना पाच दिवसांचा आठवडा नसुन पुर्ण सप्ताह काम करायला लावले जात आहे. पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना उलट शासनाने कोविड योध्दा म्हणून उत्तेजनार्थ / विशेष वाढीव वेतन दिले पाहिजे, असे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची वेतन कपात करण्यात येवू नये त्याकरिता स्वतंत्र परिपत्रक काढण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री यांच्याकडे  केली आहे.

Web Title: Mp intiyaj jaleel letter to chief minister and deputy chief minister regarding giving extra money to corona warriors nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2021 | 05:20 PM

Topics:  

  • Imtiyaj Jalil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.