महिला गाढ झोपेत, केसांत घुसला साप अन् मग जे झालं... चित्तथरारक घटनेचा Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. यातील अनेक व्हिडिओज आपल्याला खळखळून हसवतात तर काही आश्चर्याचा धक्का देऊन जातात. सध्या असाच एक व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. गाढ लागलेली झोप आपल्याला किती महागात पडू शकते याचे उत्तम उदाहरण या व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वचजण आवक् झाले आहेत. नक्की यात काय आहे सविस्तर जाणून घेऊयात.
साप हा एक असा जीव आहे ज्याला नुसते बघितलेले तरी अनेकांच्या तोंडाला घाम फुटू लागतो. हा विषारी प्राणी कधी कोणाचा जीव घेईल याचा काय नेम नाय. अशावेळेस साप थेट केसांतच घुसला तर काय होईल विचार करा… सध्या असाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नीट पाहिला तर दिसते की, एक महिला गाढ झोपली आहे. आपल्या झोपेचा आनंद घेत असतानाच अचानक तिच्या केसांच्या आत एक साप प्रवेश करतो आणि हळूहळू हा साप त्या महिलेच्या केसांच्या आत जाऊ लागतो. हा सर्व प्रकार पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन हादरू लागेल.
हेदेखील वाचा – आश्चर्य! गिटारच्या धूनवर नाचू लागले मासे; व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही
हा व्हायरल व्हिडिओ @kashikyatra नावाच्या इंसगटग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 2.1 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आपल्या धक्कादायक प्रतिक्रिया अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, हा प्राणघातक साप आहे तर दुसऱ्या युजरने लिहिले की, साप नेहमी धोकादायक नसल्याचे म्हटले आहे. पुढे या सापाचं नक्की काय झालं याबाबत काही अधिकृत माहिती मिळालेली नाही.