फोटो सौजन्य: iStock
सध्या इंटनेटच्या जगात काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी कधी इतके विचित्र व्हिडीओ व्हायरल होतात की बघून पूर्ण मूड खराब होऊन जातो. काही व्हिडीओ पाहून रागही येतो. अनेकवेळा असे व्हिडीओ समोर येतात जे धक्कादायक असतात. असे काही व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण काही असे व्हिडीओ असतात जे मनाला आनंद देतात. पाहून अगदी मन प्रसन्न झाल्यासारखे वाटते.
असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, हे खरंच घडू शकतं का? जर आम्ही तुम्हाला सांगितले की मासे गिटारच्या ट्यूनला प्रतिसाद देतात, तर तुमचा विश्वास बसेल का? क्षणभर वाटले की असे होऊ शकत नाही पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संभ्रम दूर होईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मासे गिटारच्या तालावर नाचत आहेत
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण नदीच्या काठावर बसून गिटार वाजवत आहे. तरुण गिटार वाजवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुण ज्या पद्धतीने गिटार वाजवत आहे, त्यावर मासेही प्रतिक्रिया देऊ लागतात. व्हिडिओ पाहून असे वाटते की, मासे गिटारवर नाचत आहेत. पाणी जालाप्रमाणे प्रतिक्रिया देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
This is great fishes respond to the guitar. pic.twitter.com/QPCGrx8OKy — Figen (@TheFigen_) July 28, 2024
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक काय म्हणाले?
हा व्हिडिओ एक्सवर @TheFigen या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘व्वा यार, विश्वास बसत नाही की असे होऊ शकते.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘भाऊ, हे खरोखर मासे आहेत आणि ते गिटाकच्या ट्यूनवर रिसपॉन्स देत आहेत. असेही शक्य आहे? असा प्रश्न एकाने विचारला आहे. व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘माशांनाही संगीत आवडते.’