आज, 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. भारताचे महान शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.
याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 28 फेब्रुवारी 1928 रोजी भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांच्या ‘रामन इफेक्ट’ या महान शोधाची पुष्टी झाली. नंतर, 1930 मध्ये, शास्त्रज्ञ सीव्ही रमण यांना त्यांच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले. तथापि, भारत सरकारला नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन (NCSTC) ने 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळण्याचा सल्ला दिला होता.
देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रमन यांनी रामन परिणामाचा (Raman Effect)शोध लावला. यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.
कोण होते सी.व्ही. रमन?
प्रतिभावान शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. १९२८ सी व्ही रामन यांनी ‘रामन इफेक्ट’ चा शोध लावला. त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रामन इफेक्टचा शोध 28 फेब्रुवारी 1928 रोजी महान शास्त्रज्ञ सी व्ही रमन यांनी लावला होता.
पारदर्शी माध्यमातून जेंव्हा प्रकाश प्रवास करतो तेंव्हा प्रकाश एका अर्थाने विखुरतो आणि बाहेर पडणारा प्रकाश हा आत जाणाऱ्या प्रकाशाच्या कंपतेपेक्षा कमी पण अनेक कंपने असलेल्या स्वरूपात बाहेर पडतो, यालाच रामन इफेक्ट असे म्हणतात.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचा मूळ उद्देश लोकांमध्ये विज्ञानाचे महत्त्व आणि त्याचा उपयोग याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.
पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला.