मुंबई : आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathaiwadi) सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने आतापर्यंत 47.12 कोटींची कमाई केली. जाहीरातविश्वात अग्रणी असलेल्या अमूलने देखील आता गंगूबाई काठीयावाडीचं यश एन्कॅश करायचं ठरवलं आहे.त्यामुळे आता अमूलची नवी जाहीरात गंगूबाईची काठीयावाडीवर आधारीत आहे.
‘खालिया बटर’ असे विचारत अमूलने ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. खालिया बटर हे सिनेमात मुख्य भूमिका असलेल्या आलिया भट्टच्या (Alia Bhatt) नावासोबत मिळते जुळते आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आलिया भट्टनेदेखील हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाचे लेखन हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. या सिनेमात आलिया भट्टसह अजय देवगण, जिम सरभ आणि शंतनू महेश्वरीदेखील मुख्य भूमिकेत आहेत. विकेण्डलादेखील या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.
The success of Bollywood’s new release, Gangubai Kathiawadi… pic.twitter.com/K2MlutgJ2W
— Amul.coop (@Amul_Coop) February 28, 2022