
मुंबई : सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सर्वच व्यवहार हे ऑनलाईन होतात. या ऑनलाईन सेवांमुळे ग्राहकांची चांगलीच सोय झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन बॅंकिंगच्या (Online Banking) वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र या ऑनलाईन सेवांचा जितका फायदा आहे तितकाच धोकाही आहे. ऑनलाईन गंडा घालण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्राहकांना वारंवार जागरुक करत असते. आरबीआयने (RBI) आता डेबिट कार्डधारकांना आपल्या कार्ड सेटिंगमध्ये बदलण्याचं आवाहन केलं आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात बँक खातेधारक डेबिट कार्डाचा वापर करतात. मात्र निष्काळजीपणामुळे काही डेबिट कार्डधारकांना ऑनलाईन गंडा बसतो. असा प्रकार होऊ नये, म्हणून आरबीआयने कार्डधारकांना आवाहन केलं आहे. आरबीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. डेबिट कार्डाच्या सेटिंगमध्ये बदल करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे ऑनलाईन फ्रॉड होण्याची शक्यता कमी होण्यास मदत होणार आहे.
[read_also content=”Amazon ने लाँच केली विचित्र बिकीनी; यामुळे माजला हाहाकार, काही वेळातच प्रॉडक्ट हटवण्याची ओढवली नामुष्की https://www.navarashtra.com/latest-news/bikini-launched-by-amazon-the-product-had-to-be-deleted-immediately-nrvb-139055.html”]
ग्राहकांना डेबिट कार्डाद्वारे दररोज व्यवहार करण्यासंदर्भात काही मर्यादा असतात. म्हणजेच दररोज ठराविक रक्कमेनुसार व्यवहार करता येतो. त्यामुळे ग्राहकांनी डेबिट कार्डाद्वारे कमीत कमी व्यवहार करावे. यामुळे कोणीही ऑनलाईन फसवणूक करु शकणार नाही.
.@RBI कहता है..
अपना कार्ड सुरक्षित रखें
-लेन-देन के लिए दैनिक सीमा तय करें
– घरेलू/अंतरराष्ट्रीय उपयोग के लिए सीमा तय करें
-अंतर्राष्ट्रीय उपयोग चालू/बंद करें
यह धोखाधड़ी से होने वाले नुकसान, और आपके खर्च, दोनों को सीमित रखता है#rbikehtahai #StaySafehttps://t.co/mKPAIp5rA3 pic.twitter.com/HsPwdWoknm — RBI Says (@RBIsays) May 28, 2021
डेबिट कार्डसाठीही काही मर्यादा असतात. म्हणजेच काही डेबिट कार्ड हे केवळ देशांतर्गत करता येतो. सेटिंग बदलून या कार्डाचा वापर परदेशातही केला जातो. मात्र, जर तुम्हाला डेबिट कार्डाचा वापर आंतरराष्ट्रीय पातळीवर करायचा नसेल, तर तुम्ही आंतरराष्ट्रीय सेवा तात्पुरती खंडित करु शकता. यामुळे तुमच्या सोबत होणाऱ्या फसवणुकीची शक्यता आणखी कमी होते.
[read_also content=”महाराष्ट्रात ई-पासची ‘तत्वतः’ गरज, मात्र ‘प्रत्यक्षात’ गरज नाही, जाणून घ्या काय आहे प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/reality-about-e-pass-for-private-vehicles-in-maharashtra-nraj-139069.html”]
डेबिट कार्डवर दैनंदिन मर्यादा निश्चित केल्याने ठराविक रक्कमेनंतर डेबिट कार्डने व्यवहार करता येणार नाही. ही सेटिंग बदलण्यासाठी ग्राहकांना आपल्या बँकेच्या वेबसाईटवरुन नेट बॅंकिगद्वारे हे बदल करता येतील.
new guidelines for debit card holders to prevent online fraud announcement by rbi