मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) आजची रात्रही तुरूंगातच जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आर्यनच्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) संपली आहे. कोर्टाचं काम संपल्यामुळे आर्यनची सुनावणी (Hearing) उद्या (बुधवार) होणार आहे.
२० ऑक्टोबर रोजी एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने तातडीच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नंतर या प्रकरणात आर्यनची न्यायालयीन कोठडी ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी अॅड मुकूल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी पुढाकार घेतला आहे.
[read_also content=”बहुसदस्यीय प्रभाग पध्दती लागू झाल्याने राज्यात नगरसेवक संख्या वाढणार! https://www.navarashtra.com/latest-news/implementation-of-multi-member-ward-system-will-increase-the-number-of-corporators-in-the-state-nrms-196409.html”]
सुरूवातीला NCB च्या वकिलांनी आर्यनच्या जामीनावर विरोध केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, काही एजन्सीने सांगितलं की, जामीन मिळाल्यानंतर तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो. तसेच तो देश सोडून पळून जाऊ शकतो.