Pak vs Ban: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शाकिब अल हसनने केले असे काही...; सोशल मीडियावर Video व्हायरल
सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात २ सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जात आहे. ही सिरीज पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे. दरम्यान पाकिस्तानच्या रावळपिंडी येथे बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केले आहे. रावळपिंडी येथे सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला १० गाडी राखून पराभूत केले आहे. अशा प्रकारे विजय मिळवून बांगलादेशने एक नवीन इतिहासच घडविला आहे. मात्र या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो पाकिस्तानच्या यष्टिरक्षकावर चेंडू फेकताना दिसत आहे.
शाकिब अल हसनला आपण अनेकदा मैदानात पंचांशी किंवा खेळाडूंशी गैरवर्तन करताना पाहिले आहे. दरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शाकिबचे गैरवर्तन पाहायला मिळाले. कसोटीच्या शेवटच्या दिवशी शाकिब अल हसन पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानवर चेंडू फेकताना दिसला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता. शाकिब अल हसन ३३ वे षटक टाकत होता. त्यावेळेस बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी लवकरात लवकर विकेट घेणे आवश्यक होते. मात्र मोहम्मद रिझवान फलंदाजीसाठी वेळ लावत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. मोहम्मद रिझवान तयार नसताना शाकिबने रनअप घेतला. त्यानंतर तो थांबला नाही आणि त्याने चेंडू रिझवानकडे फेकला. मात्र यात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र शाकिबच्या या कृतीने पंच देखील आश्चर्यचकित झाले.
Shakib 😭😭🤣🤣 #PakistanCricket #PAKvBAN #ShakibAlHasan pic.twitter.com/sgBE5kRqYm
— Jack (@jackyu_17) August 25, 2024
शकिब अल हसनने केलेली ही कृती पंचांना अजिबात आवडली नाही. त्यांनी या कृतीबद्दल पंचांनी चेतावणी देखील दिली. मात्र नंतर शाकिबने माफी देखील मागितली. या घटनेचा व्हिडीओ एक्स वर पोस्ट करण्यात आला आहे. दोन सामन्यांच्या सिरीजमध्ये बांगलादेशने विजय प्राप्त करून १-० अशी आघाडी मिळविली आहे. या विजयाने डब्ल्यूटीसीची फायनल खेळण्याच्या पाकीस्तानच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत.