पालघर: पालघर जिल्हयातल्या खाजगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या आहेेेत. अधिग्रहीत करण्यात आलेले खाजगी डॉक्टर हे पालघरच्या जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याशी समन्वय साधून काम करणार असल्याची मााहिती जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी दिली आहे.
पालघर जिल्हयातल्या रिवेरा विक्रमगडमधल्या रिवेरा, वाडयामधल्या आयडीएल, टिमा, नंडोरे, मनोर , पालघरमधली साईबाबा सोसायटी , जव्हारमधले मुला / मुलींचे वसतीगृह , मोखाडा मधले न्यु तहसिल कार्यालय , डहाणू मधली संतोषी आश्रम शाळा, मोखाडा मधले आयटीआय, तलासरी मधली उधवा आश्रम शाळा या ठिकाणी कोव्हीड केअर सेंटर , डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेन्टर, आणि डेडिकेट कोव्हीड हॉस्पिटल ही केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
या ठिकाणी ठिकाणी कोविड -१९ रुग्णांना वेळेवर उपचार देण्यासाठी आदेश काढण्यात करण्यात आले असून यासाठी जिल्हयातल्या खाजगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. अधिग्रहीत करण्यात आलेले खाजगी डॉक्टर हे पालघरच्या जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याशी समन्वय साधून कामकाज करणार आहेत. त्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या खाजगी डॉक्टरांच्या राहण्याची, जेवणाची आणि भत्याची व्यवस्था पालघरच्या जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडून करण्यात आली आहे. ज्या खाजगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करण्यात आलेली आहे त्यांनी त्यांना दिलेल्या केंद्रावर आपली सेवा तात्काळ देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.