बीड : जिल्ह्यातील ५ नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत वडवणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर केजमध्ये आघाडी आणि आष्टी, पाटोदा शिरूरमध्ये भाजपने बाजी मारली आहे. प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या वडवणीमध्ये भाजपचे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीने इथे बाजी मारली आहे.
[read_also content=”दीड वर्षाच्या बालकाने गिळली टाचणी अन् मग… https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/sangli/a-one-and-half-year-old-girl-eat-pin-which-is-stuck-into-stomach-incident-in-miraj-sangli-nrka-238185.html”]
पाच नगर पंचायतीसाठी मागील महिन्यात निवडणूक पार पडली. यामध्ये तीन नगर पंचायतीमध्ये भाजपने तर केजमध्ये जनविकास आघाडी आणि वडवणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. आज नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली त्यात आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदी पल्लवी धोंडे यांची बिनविरोध निवड तर उपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्त्रबुद्धे यांची बिनविरोध निवड झाली. पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्षपदी सय्यद खतीजाबी सय्यद अमर यांची बिनविरोध निवड तर उपनगराध्यक्ष शरद बांदळे यांची निवड झाली. केज मध्ये राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवून काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडी बरोबर हात मिळवणी केल्यानं इथे काँग्रेने सत्ता मिळवली आहे.
[read_also content=”सांगलीतल्या बाजारपेठेत हापूस आंबा दाखल, ग्राहकांना पडलीये भुरळ https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/sangli/hapus-mangoes-are-introduced-in-the-market-in-sangli-238168.html”]