Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्ग चक्रीवादळापेक्षा तौत्के चक्रीवादळाच्या वेगाची रायगडमध्ये चर्चा, किनारपट्टीच्या भागातील लोकांच्या मनात वेगळीच दहशत,प्रशासनाने केलं ‘हे’ आवाहन

हिंद महासागरातुन अरबी समुद्राकडे आलेले तौते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) रायगड जिल्ह्यात वादळ सदृश्य स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 15, 2021 | 05:42 PM
cyclone

cyclone

Follow Us
Close
Follow Us:

माणगाव: भारतीय हवामान विभागाने(IMD) दिलेल्या सुचनेनुसार पूर्व मध्य अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थितीमुळे समुद्र किनारपट्टी(Coastal Area) व खाडीलगतच्या भागात मोठ्या प्रमाणात वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने १६ व १७ मे रोजी रायगड(Raigad) जिल्ह्यातही ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. हिंद महासागरातुन अरबी समुद्राकडे आलेले तौत्के चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) रायगड जिल्ह्यात वादळ सदृश्य स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. लोकांमध्ये या वादळाच्या वेगाचीच जास्त चर्चा ऐकावयास मिळत आहे.

[read_also content=”तौते चक्रीवादळाचा देशभरात विविध ठिकाणी तडाखा – घरांचे नुकसान, झाडेही उन्मळून पडली, मुसळधार पावसाची हजेरी https://www.navarashtra.com/latest-news/house-collapsed-and-trees-fall-in-various-places-of-india-due-to-cyclone-tauktae-nrsr-129321.html”]

वादळाबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत.  ताशी १७५ किमी वेगाने वारे वाहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तत्कालीन निसर्ग चक्रीवादळाचा वेग ताशी १२० किमी सांगण्यात आला होता पण प्रत्यक्षात मात्र तो १४० किमी इतका होता. आजही त्या आठवणीने अंगावर काटा उभा राहतो. घोंगावणारा चित्कारणारा वारा आणि खेळाच्या पत्त्यांप्रमाणे घरांवरील इमारतीवरील पत्रे छप्पर उडून झालेले नुकसान, शेकडो वर्षांचे महाकाय वृक्ष उन्मळुन पडले, माडाची झाड अर्धवट मोडली. माड-सुपारीच्या बागा उध्दवस्त झाल्या होत्या. संपूर्ण महावितरण व्यवस्था कोलमडली वीजेच पोल वाकले, पिळले तारा मोडल्या अनेक दिवस अनेक गावे अंधारात गेली.

त्या प्रचंड वेगाने माणसाच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सर्वत्र या वेगाचीच चर्चा आहे. सोशल माध्यंमावर काल झालेल्या वादळी पावसाची छायाचित्र फिरत आहेत. जराशा वादळाने पत्रे उडाले झाडांच्या फांद्या पडल्या पाऊस पडला हे पाहता लोकांच्या मनात उद्याच्या वादळाचे काहुर माजले आहे.

रात्रीचे वादळ झाले तर काय अवस्था होईल याची मनात भिती आहे. शासनाच्या पूर्व सुचना, हाय अलर्ट संदेश सर्वत्र फिरत आहेत. दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी रात्री तासभर पाऊस पडला मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे प्रचंड उष्णता वाढली आणि त्यातच काही काळ वीज खंडीत झाली. माणसाचे जीवन त्रस्त झाले आहे. वादळाच्या भितीने लोक आवश्यक साहित्य व लाईट गेल्यास तात्पुरत्या तयारीस लागले आहेत.

हाय अलर्ट
रायगड जिल्ह्यात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात जोरदार वारे मुसळधार पाऊस होऊ शकतो.  माणगांवकरांनी सतर्क राहुन स्वतःची व स्वतःचे कुटुंबाची काळजी घ्यावी. नागरिकांनी या कालावधित कोणतीही मदत लागल्यास माणगांव नगरपंचायत आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक ०२१४०२६३०५६ तसेच ९६०७५६४३२९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन माणगाव नगरपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

तसेच या कालावधीत कोणीही घराबाहेर पडू नये, तसेच घरात पिण्याचे पाणी व खाण्याच्या पदार्थांचा पुरेसा साठा करुन ठेवणे, नागरिकांनी स्वतःची वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करुन ठेवावे, असे सांगण्यात आले आहे.

मुसळधार पाऊस पडते वेळी घरातील काचेच्या खिडक्यांपासुन दूर राहावे. धोकादायक व कच्च्या घरामध्ये राहणाऱ्यांनी या कालावधित सुरक्षित ठिकाणी स्वतःची राहणेची व्यवस्था करावी. ज्यांच्या घरांची छप्परे पत्र्याची आहेत त्यांनीपत्र्यांची दुरुस्ती करुन घ्यावी. जेणे करुन नागरिकांचे जिवीतास हानी पोहचणार नाही. खोलगट भागात व ज्याठिकाणी पावसाचे पाणी साचते त्याभागातील नागरिकांनी स्वतःची व स्वतःचे घरातील सामानाची काळजी घ्यावी. आपल्या घराचे आजुबाजुस उंच झाडे असतील नागरिकांनी सावध सतर्क राहावे. अफवांकडे लक्ष देऊ नये वा अफवा पसरवु नये. शुन्य जीवितहानी हेच प्रशासनाचे ध्येय आहे. यासाठीच नागरिकांनी सतर्क राहुन सुचनांचे पालन करीत नगर पंचायतीस सहकार्य करावे, असे माणगाव नगरपंचायतीकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: People are more frightened of tauktae cyclone coastal area may affect nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2021 | 05:26 PM

Topics:  

  • alert by climate

संबंधित बातम्या

इक्वेडोरच्या पॅसिफिक किनाऱ्यावर 6.3 तीव्रतेचा भूकंप; 10 प्रांतांमध्ये हादरे, त्सुनामीचा इशारा
1

इक्वेडोरच्या पॅसिफिक किनाऱ्यावर 6.3 तीव्रतेचा भूकंप; 10 प्रांतांमध्ये हादरे, त्सुनामीचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.