Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माघी यात्रेसाठी पोलिस प्रशासन सज्ज; ८० अधिकाऱ्यांसह १५०० पोलिसांचा फौजफाटा

पंढरपूर येथे हाेणाऱ्या माघवारीचा (Maghi Yatra Pandharpur) गुरूवारी मुख्य दिवस आहे. पंढरपूर शहरात वाहतूकीची कोंडी निर्माण होऊ नये, म्हणून शहरातील महत्वाच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक, पार्कींग नियोजन करणे व शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना काही ठिकाणी प्रवेश बंद करणे गरजेचे असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 10, 2022 | 01:51 PM
माघी यात्रेसाठी पोलिस प्रशासन सज्ज; ८० अधिकाऱ्यांसह १५०० पोलिसांचा फौजफाटा
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पंढरपूर येथे हाेणाऱ्या माघवारीचा (Maghi Yatra Pandharpur) गुरूवारी मुख्य दिवस आहे. पंढरपूर शहरात वाहतूकीची कोंडी निर्माण होऊ नये, म्हणून शहरातील महत्वाच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक, पार्कींग नियोजन करणे व शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना काही ठिकाणी प्रवेश बंद करणे गरजेचे असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. हे आदेश १६ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहेत.

तसेच जड वाहतूक पर्यायी मार्गाने करण्यात आली आहे. याचा अवलंब वाहनचालकांनी करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. कोणताही अनूचित प्रकार घडू नये व भाविकांच्या सुरक्षेसाठी ८० अधिकारी व १५०० पोलीस व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जारी केलेल्या आदेशात म्हटल्याप्रमाणे प्रवेश व्यवस्था खालीलप्रमाणे – 

शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांबाबत

नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने अहिल्या चौक, शेटफळ चौकमार्गे मोहोळ रोड विसावा येथे पार्किंग करतील. तसेच ६५ एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्किंग करतील. पुणे, सातारा, वाखरीमार्गे येणारी वाहने इसबाबी विसावा येथे पार्किंग करतील. कंडरे जीमचे समोरील जागेत व कॉलेज क्रॉस चौकी येथील पाठीमागील मैदानात पार्किंग करतील.

कराड, आटपाडी, दिघंचीकडून येणारी वाहने कराड रोड वेअर हाउसमध्ये पार्किंग करतील. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोलाकडून येणारी वाहने ही कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे वेअर हाउसमध्ये पार्किंग करतील. विजापूर, मंगळवेढामार्गे येणारी वाहने ही कासेगाव फाटा, टाकळी बायपास मार्गे वेअर हाउस आणि यमाई तुकाई मंदिर मैदान येथे पार्किंग करतील.

शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहतूकीबाबत

टेंभूर्णी, अहमदनगर, सोलापूर, लातूर, बीड, उस्मानाबादकडे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस चौक, कौठाळी बायपास, नविन सोलापूर नाका या मार्गाने जातील. पुणे, साताराकडे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक, नविन कराड नाका, कॉलेज क्रॉस चौक, वाखरी मार्गे जातील. विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढाकडे जाणा-या सर्व गाडया सावरकर चौक, नवीन कराड नाका, टाकळी बायपास, गादेगाव फाटापासून संबंधीत आपल्या मार्गे जातील.

शहरातील अंतर्गत वाहतूकीबाबत

प्रदक्षिणा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनास बंद करण्यात येत आहे. महाव्दार चौक ते शिवाजी चौक आणि सावरकर चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे. बार्शी, सोलापूर या मार्गावरून तीन रस्ता मार्गे येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पंटागणात उतरतील. नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणा-या एस. टी. बसेस यांना जुना दगडीपूल, नवीन पुल, तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येत आहे.

मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक, लहुजी वस्ताद चौक या मार्गाने शहरात सर्व प्रकारचे वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पंटागण ते अर्बन बँक, शिवाजी चौक ते अर्बन बँक, संकुल कॉर्नर ते नगरपालिका हा मार्ग पासेसच्या वाहनाव्यतिरीक्त इतर सर्व वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पोलिसांचा मोठा फौजफाटा

माघी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. यात्रा कालावधीत कोणताही अनूचित प्रकार घडू नये व भाविकांच्या सुरक्षेसाठी ८० अधिकारी व १५०० पोलीस व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत विविध पथकांमार्फत करडी नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.

Web Title: Police security tight for maghi yatra pandharpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2022 | 01:51 PM

Topics:  

  • Maghi Yatra Pandharpur
  • police security

संबंधित बातम्या

लक्ष्मण हाकेंवरील ह्ल्ल्याची घेतली गंभीर दखल; तातडीने दिली ‘या’ दर्जाची सुरक्षा
1

लक्ष्मण हाकेंवरील ह्ल्ल्याची घेतली गंभीर दखल; तातडीने दिली ‘या’ दर्जाची सुरक्षा

सण, उत्सवांसाठी मुंबई पोलिस यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर; गर्दी टाळण्याचे असणार आव्हान
2

सण, उत्सवांसाठी मुंबई पोलिस यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर; गर्दी टाळण्याचे असणार आव्हान

मुंबईतील यंत्रणा ‘ॲलर्ट मोड’वर; सुरक्षा यंत्रणा सज्ज, सर्वतोपरी खबरदारी
3

मुंबईतील यंत्रणा ‘ॲलर्ट मोड’वर; सुरक्षा यंत्रणा सज्ज, सर्वतोपरी खबरदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.