Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिठी नदीचे प्रदूषण राेखणार; ५०० कोटींच्या प्रकल्पाला स्थायी समितीची मंजुरी

रस्ते दुरुस्तीच्या घोटाळ्यात पालिकेने २०१६ मध्ये जे. कुमार या कंपनीला सात वर्षांसाठी काळ्या यादीत टाकत दंड ठोठावला होता. त्यावर जे.कुमार कंपनीने न्यायालयात आव्हान दिले. त्यावर याबाबत फेरआढावा घेण्याचे निर्देश न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले होते.

  • By Navarashtra News Network
Updated On: Aug 18, 2021 | 07:47 PM
मिठी नदीचे प्रदूषण राेखणार; ५०० कोटींच्या प्रकल्पाला स्थायी समितीची मंजुरी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई (Mumbai) : २५ जुलैच्या प्रलयाला कारण ठरलेली मिठी नदी स्वच्छ-सुंदर करण्यासाठी (clean up the Mithi river) आणि तिचे प्रदूषण राेखण्यासाठी (to control its pollution) पालिकेने नदी प्रवाहात जाणारे मलजल (sewage water) रोखण्याचा निर्णय घेतला आहे. कुर्ला (Kurla) येथे नदीत जाणारे दोन नाल्यांमधील मलजल भूमिगत ६ किमी टनेलने (6 km underground tunnel) धारावीतील प्रक्रिया केंद्रात (the processing center at Dharavi) आणले जाणार आहे.

५०० कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आज बृहन्मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने (the Standing Committee of BMC) मंजुरी दिली अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav, Chairman of the Standing Committee) यांनी दिली.

मिठी नदीचे प्रदूषण राेखणे किनार्‍यावर आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे, सुशोभिकरण, सायकल ट्रॅक असे अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहेत. मिठी नदी शुद्धीकरणासाठी काही ठिकाणी मलजल शुद्धीकरण प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत. कुर्ला येथील सफेद पूल आणि बापट नाला थेट मिठी नदीत मिळतो. त्यामुळे या नाल्यातील मलजल मिठीनदीत जाण्यापासून रोखण्यासाठी ६.७ किमीचा बोगदा बांधण्यात येणार आहे.

[read_also content=”मुंबई/ विनायक राऊत यांनी छोट्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करू नये; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/vinayak-raut-should-not-display-dogmatic-attitude-opposition-leader-praveen-darekar-criticism-nrat-170823/”]

भविष्याची गरज ओळखून २०५१ पर्यंतचा दिवसाला अंदाजित १६८ दशलक्ष लिटर मलजल प्रवाह लक्षात घेऊन हा बोगदा बांधण्यात येणार आहे. २.६ मिटर व्यासाचा आणि ६.५ किलोमिटर लांबीचा बोगदा बांधण्यासाठी तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच इतर करासह हा खर्च ६०४ कोटी पर्यंत जाणार आहे.

रस्ते दुरुस्तीच्या घोटाळ्यात पालिकेने २०१६ मध्ये जे. कुमार या कंपनीला सात वर्षांसाठी काळ्या यादीत टाकत दंड ठोठावला होता. त्यावर जे.कुमार कंपनीने न्यायालयात आव्हान दिले. त्यावर याबाबत फेरआढावा घेण्याचे निर्देश न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पालिकेने जे. कुमार या कंपनीचा काळ्या यादीचा कालावधी तीन वर्षांवर आणला; मात्र दंडाच्या रकमेत वाढ केली होती. जे. कुमार यांचा काळ्या यादीतील कालावधी २०१९ मध्ये संपला आहे. त्यामुळे आता कायदेशीररीत्या ही कंपनी पालिकेच्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

[read_also content=”नागपूर/ पवार यांच्या वक्तव्यामुळे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? ते समोर आले : माजी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांचा घणाघाती आरोप https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/who-is-shukracharya-in-jharkhand-because-of-sharad-pawar-statement-they-came-to-the-fore-former-energy-minister-bavankule-scathing-allegations-nrat-170816/”]

हा प्रस्ताव सर्वपक्षीयांच्या पाठिंब्याने मंजूर करण्यात आला. कुर्ल्यापासून धारावीपर्यंत जाणारा हा बोगदा कांदळवनाच्या खालून जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र या कामासाठी संबंधित कंत्राटदाराला पर्यावरण विभागाची परवानगी घेणे बंधनकारक राहणार असल्याचे समजते.

असा असेल बाेगदा
– बोगद्याची लांबी – ६.७ किला मीटर
– बोगद्याचा व्यास – २.६ मिटर
– शाफ्टचा अंतर्गत व्यास – १० मीटर
– कार्यादेश मिळाल्यानंतर ४८ महिन्यांत काम पूर्ण होणार

Web Title: Pollution of mithi river will be maintained standing committee approves rs 500 crore project nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2021 | 07:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.