कुर्डुवाडी : उस्मानाबाद येथील कत्तलखाना बंद करण्यासठी गोसेवक व पोलीस दल गेले असता धन्यकुमार पटवा (बार्शी) सतीश शिरसला, प्रशांत परदेशी, पावन कुंती (तिघे सोलापूर) व पोलीस यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून, यात धन्यकुमार पटवा गंभीर जखमी झाले आहेत. पटवा हे सोलापूर, उस्मानाबादसह परिसरात प्राणी रक्षणाचे कार्य करत असून, त्यांनी अनेक अवैध कत्तलीस चाप बसवला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कुर्डुवाडी येथील जीवनरक्षा समितीने झालेल्या हल्ल्यांची चौकशी करुन कत्तलखाना बंद करण्यासाठी निवेदन सहाय्यक पोलिस निरीक्षकांना दिले असून, त्याच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पाठवल्या आहेत व सदर घटनेचा निषेध नोंदवला आहे. यावेळी राहुल धोका, किरण गोडसे, वसंतराव मुंडवे, बाळासाहेब शेंडगे यावेळी उपस्थित होते.