Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Budget 2025: १.२५ लाख सरकारी नौकऱ्या, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, राजस्थान अर्थसंकल्पातील सर्व प्रमुख घोषणा एका क्लिकवर

Rajasthan Budget 2025:राजस्थानच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात ३१ जानेवारीला राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या अभिभाषणाने झाली. आज राज्याच्या अर्थमंत्री दिया कुमारी यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अनेक घोषणा केल्या

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Feb 19, 2025 | 02:54 PM
Rajasthan Budget 2025: १.२५ लाख सरकारी नौकऱ्या, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा..राजस्थान अर्थसंकल्पातील सर्व प्रमुख घोषणा एका क्लिकवर (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Rajasthan Budget 2025: १.२५ लाख सरकारी नौकऱ्या, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा..राजस्थान अर्थसंकल्पातील सर्व प्रमुख घोषणा एका क्लिकवर (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Rajasthan Budget 2025 Marathi News: राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दिया कुमारी यांनी आज २०२५-२६ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. २०३० पर्यंत राजस्थानला ३५० अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय ठेवून या अर्थसंकल्पात रोजगार, पायाभूत सुविधा आणि पाणीपुरवठा यावर लक्ष केंद्रित केले आहे.  अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करताना, अर्थमंत्र्यांनी सुमारे १.२५ लाख सरकारी नोकऱ्यांच्या घोषणेसह सर्वसामान्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय जाहीर केले आहेत. सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने १५० युनिटपर्यंत वीज मोफत केली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम वाढवली

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी वाढीव योजना जाहीर केल्या. पुढील वर्षापासून पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम ९ हजार रुपये करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच, गव्हाच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त बोनसची रक्कम प्रति क्विंटल १५० रुपये करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ५० हजार कृषी जोडण्यांची भेटही देण्यात आली आहे. याशिवाय, गोपाळ क्रेडिट कार्डद्वारे योजनेअंतर्गत कर्ज दिले जाईल.

Hurun India 500 List: ‘या’ आहेत भारतातील टॉप 10 कंपन्या, हुरुन इंडियाने जाहीर केली यादी

वन विकासासाठी हरित बजेट

या अर्थसंकल्पात हरित विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राजस्थानच्या अर्थमंत्री दिया कुमारी यांनी अर्थसंकल्पात वन विकासासाठी २७,८५४ कोटी रुपयांचे हरित बजेट जाहीर केले. याअंतर्गत १० कोटी रोपे लावली जातील. तसेच, राजस्थानमध्ये बायोगॅस प्लांट बसवू इच्छिणाऱ्यांना पुढील वर्षापासून राजस्थान सरकारकडून अनुदान दिले जाईल.

वसतिगृहे आणि निवासी महाविद्यालये बांधणार

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना लक्षात घेऊन, नवीन वसतिगृहे आणि निवासी महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच, तरुणांना मोफत भाषा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातील.

तरुणांसाठी विश्वकर्मा युवा उद्यमी योजना

राज्यात तरुणांसाठी विश्वकर्मा युवा उद्यमी योजना सुरू केली जाईल. या योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ८ टक्के व्याज अनुदान आणि ५ लाख रुपयांपर्यंत मार्जिन मनी देण्यात येईल. अर्थमंत्री दिया कुमारी यांनी यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय, ओबीसी आणि इतर महामंडळांनी दिलेल्या कर्जाच्या एकवेळच्या निपटाऱ्याकरिता एक योजना प्रस्तावित आहे.

१५० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा

अर्थमंत्री दिया कुमारी यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, दरमहा १५० युनिट मोफत वीज दिली जाईल. पूर्वी फक्त १०० युनिट मोफत वीज मिळत होती, पण आता ती ५० युनिटने वाढवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना मोठी भेट

अर्थमंत्री दिया कुमारी यांनी अर्थसंकल्पात पन्नास हजार कृषी आणि पाच घरगुती वीज जोडण्या देण्याची घोषणा केली आहे. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी, राज्य सरकारने सिंचनाच्या पाणी साठवणुकीच्या कामांवरही लक्ष केंद्रित करणार असल्याचे म्हटले आहे.

रस्ते सुरक्षेवर भर

रस्ता सुरक्षा लक्षात घेऊन, राज्य सरकारकडून दिल्ली-जयपूर, जयपूर-आग्रा आणि जयपूर-कोटा मार्गांवर विशेष काम केले जाईल. याअंतर्गत येथे विकास केला जाईल. तसेच, शून्य अपघात क्षेत्र तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सर्वेक्षणाद्वारे अशी ठिकाणे ओळखली जातील. राज्य महामार्गांवर ट्रॉमा सेंटर विकसित करण्यासाठी पीपी मोडवर काम केले जाईल. यासाठी ५० कोटी रुपये खर्च येणार आहेत. याशिवाय, जीवनरक्षक सुविधा असलेल्या २५ नवीन रुग्णवाहिका देखील उपलब्ध असतील.

व्यवसाय वाढवण्यासाठी व्यापार धोरण

राज्याचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी नवीन व्यापार धोरण लागू करण्यात येणार आहे. याशिवाय, कोटा, जोधपूर, जयपूर आणि सिकर येथे युवा साथी केंद्रे उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे.

सरकारचे व्हिजन

दिया कुमारी यांनी अर्थसंकल्प सादर करताना अधोरेखित केले की सरकारने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यातील ५८% आश्वासने आणि मागील अर्थसंकल्पातील ७३% घोषणा पूर्ण केल्या आहेत. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या जलद आर्थिक विकासासाठी वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला.

शेअर मार्केट रिकव्हरी मोड मध्ये, जाणून घ्या अपडेट्स

Web Title: Rajasthan budget 2025 125 lakh govt jobs water supply infrastructureall major rajasthan budget announcements in one click

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 02:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.